संत सेना महाराज-

Started by Atul Kaviraje, June 20, 2025, 09:58:25 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                          "संत चरित्र"
                         ------------

          संत सेना महाराज-

अनेकदा भगवद्भक्तांचा मेळा घरी येत असे. 'साधुसंत येती घरा। तोचि दिवाळी दसरा।' या प्रसंगाने त्यांना नेहमी अत्यानंद होत असे. संतसेवे पुढे त्यांना इतर काही सूचत नसे. अनेक वेळा अशा प्रसंगी राजाच्या सेवेस जाण्यासही सेनाजींना उशीर होत असे. या प्रसंगी राजाला क्रोध येत असे. पुन्हा उशीर झाला तर कडक शिक्षा देईन, अशी ताकीद राजा देत असे.

 अनेक वारकरी घरी मुक्कामास येत असत. पंढरपूर हे धार्मिक चळवळीचे केंद्र झाले होते. सेनार्जींना नेहमी पंढरीस केव्हा एकदा जाईन, ही उत्सुकता होती. कधी न पाहिलेल्या विठ्ठलास केव्हा एकदा पाहीन, ही अनिवार इच्छा. 'पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी। जागृती स्वप्नी पांडुरंग॥ असा सेनाजींना ध्यास लागला होता. केव्हा एकदा पांडुरंग भेटेल ?

 एक दिवस असेच महाराष्ट्रातून अनेक साधुसंतांची मांदियाळी सेनाजींच्या घरी मुक्कामास आली. ईश्वरीभक्तांच्या आगमनामुळे पती-पत्नीना खुप आनंद झाला. संतांचे स्नान, पूजापाठ, भोजन, विश्रांती यांसारख्या गोष्टींच्या व्यवस्थेला. पत्नी सुंदरबाई त्वरित सेवेला लागली. तीर्थयात्रा, धर्मविचार या चर्चेमध्ये सेनाजींचा सकाळी बराच वेळ गेला आणि राजसेवेची रोजची वेळ टळून गेली. राजदरबारी राजा वीरसिंह वाट पाहून बेचैन झाला, त्याने सेनाजीला बोलवण्यासाठी घरी सेवक पाठविले. दाराशी राजाची माणसे आल्यावर सुंदरबाईने सांगितले, "साधुसंत पाहुणेमंडळी घरी आलेत. थोड्याच वेळात त्यांचे आदरातिथ्य आटोपून येतील," सेवकांनी दरबारी येऊन राजाला अतिशयोक्ती करून सांगितले. "सेनाजी साधूसंतांची सेवा झाल्याशिवाय दरबारी येणार नाहीत. मला साधू महत्त्वाचे आहेत."

 राजा कडाडला, संतापला, दारावरच्या चार शिपायांना बोलावून सांगितले. "सेन्याला बांधून माझ्या पुढे हजर करा" राजाच्या हुजऱ्यांना आनंद वाटला. ते म्हणू लागले, "लोकांनी या सेन्याला फार डोक्यावर घेतले आहे. तो म्हणतो "मी फक्त ईश्वराचा दास आहे... बाकी कोणालाही मी किंमत देत नाही." त्यामुळे राजा कोपिष्ट झाला, हुकूम केला, "त्वरित त्याला देहदंडाची शिक्षा द्या. शिपाई राजाञ्ञेचा हुकूम घेऊन बाहेर पडले. राजवाड्याच्या बाहेर शिपाई पडताच, काखेत धोकटी अडकवलेले सेनाजी राजासमोर उभे, राजाच्या नजरेला दिसल्याबरोबर 'सेनाजी'ला या शिपायांनी कसे पाहिले नाही, याचे नवल वाटले.

 राजा सेनाजींच्या नजरेस पडताच स्मित हास्य करून म्हणाले, "घरी अचानक संतमंडळी आली, सेवकास उशीर झाला, कसूर माफी असावी, सेवकास क्षमा करावी." राजाने सेनाजींचे उद्गार ऐकून, सेनार्जींची प्रसन्न मुद्रा पाहून राजा

--संकलन
--अतुल परब
--दिनांक-20.06.2025-शुक्रवार.
===========================================