"सर्ववर्णीत तूच नाही....!"©चारुदत्त अघोर(६/८/११)

Started by charudutta_090, August 06, 2011, 09:41:33 AM

Previous topic - Next topic

charudutta_090

ओम साई
"सर्ववर्णीत तूच नाही....!"©चारुदत्त अघोर(६/८/११)
नुसत्या हिरवळीला अर्थ नाही,जर त्यात फुलांची रंगत नाही,
निळ्या आकाशाला अर्थ नाही, जर उडत्या पाखरांची संगत नाही;
घाटी खडकांना ओलावा नाही,जर त्यात बरसणारी धबधब्याची धार नाही,
नुसत्या जिंकल्या बाजीला अर्थ नाही, जर त्यात हवी ती हार नाही,
त्या टप्पोर्या मोगरा कळीला मान नाही, जर तिचा गोवित गजरा नाही,
कोणत्याच कवी-कवितेला मान नाही,जर त्याला आदबीचा झुकता मुजरा नाही;
त्या रसाळ ओठांना किंमत नाही,जर ओठी पान-विड्याची लालीच नाही,
त्या गुलाबी कानांना नजरच नाही,जर लटकती त्यात बालीच नाही;
त्या पुरुष पूजेला अर्थ नाही,जर स्त्रीची अर्पित ओंझळ नाही,
त्या मृगनयनाला चमकच नाही,जर त्यात धारित काजळ नाही;
त्या नजरेला काय अर्थ, ज्यात प्रेम भावनेचा वचक नाही,
ती स्त्री-चालच नाही, ज्यात नखरेल लचक नाही;
त्या चंद्र-चेहेर्याला चमकच नाही,जर घसरती घन बट नाही,
त्या स्वभावाला चटक नाही,ज्यात रूसता बाल-हट नाही;
तुझ्या गं या ओतप्रोत सौंदर्याला,मानच नाही जर भोगता मीच नाही,
माझ्या या जीवनाला काय अर्थ,जर त्यात हि सर्ववर्णीत तूच नाही....!
चारुदत्त अघोर(६/८/११)