किती वर्ष झाली....

Started by केदार मेहेंदळे, August 08, 2011, 01:20:31 PM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे


त्या मागे राहिलेल्या दिवसांत परत जावस वाटतय.
सगळे झोपल्यावर, चोरून दुधावरची   साय,
अन पातेल्यातलं श्रीखंड, बोट घालून खावस वाटतय.

किती वर्ष झाली................
खोड्या केल्या म्हणून,
पाठीत धपाटा खल्ला नाही.
दिवसभर  खेळात दमून,
रात्री जेवताना पानावरच पेंगलो नाही.
कुत्र्याच्या पिल्लाला उचलून,
त्याच्या पोटाचा गरम स्पर्श अनुभवला नाही.
बर्फाचे गोळे खात,
लाचीच्या अंगठ्या करून बोटात घातल्या नाहीत.

त्या मागे राहिलेल्या दिवसांत परत जावस वाटतय.
कौलावरून पडणाऱ्या पागोळ्यान  खाली भिजत,
ओह्ळातल्या  कागदी होड्यान बरोबर धावावस वाटतय.

किती वर्ष झाली................
पावसात भिजलेल्या अंगणात,
ओल्या मातीतली गांडूळ पकडली नाहीत.
अंगणात ताररूपी खेळताना,
निसरड्या शेवाळ्या वरून घसरून आपटलो नाही.
भिंतीवरच शेवाळ खरवडत,
गवतावर उडणारे चतुर पकडत धावलो नाही.

त्या मागे राहिलेल्या दिवसांत परत जावस वाटतय.
थंडीत कुडकुडत, अंगणात शेकोटी शेकताना,
डोळ्यातून धुरानी पाणी यावस वाटतय.

किती वर्ष झाली................
थंडीतल्या उन्हात अभ्यास,
अन बंबातल्या कढत पाण्यानी अंघोळ केली नाही.
गुल्हे काडीवर उचलताना,
पायावर पडले म्हणून रडून आकांत केला नाही.

त्या मागे राहिलेल्या दिवसांत परत जावस वाटतय
ते रडण, ते हसण, तो अभ्यास, ती शाळा, ते खेळ,
ते पडण, तो मार, त्या खोड्या करत जगावस वाटतंय.

किती वर्ष झाली................
लहान राहिलोच नाही
मोठा होता होता मरत गेलो, तो पुन्हा जगलोच नाही.

केदार.......

Gaurav Patil

केदारजी.....खूप छान.....लहानपणीच्या सगळ्या आठवणी ताज्या झाल्या....

PRASAD NADKARNI

HO YAR KHUP VARSH ZALIT.........
HE SAGAL ANUBHAVAYALA PARAT LAHAN HOTA AAL ASAT TAR BAR ZAL ASAT.
FAR CHAN
AVADALI.