संत सेना महाराज-जाता पंढरीसी सुख वाटे जीवा-1

Started by Atul Kaviraje, July 03, 2025, 10:31:46 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                          "संत चरित्र"
                         ------------

        संत सेना महाराज-

सेनाजींच्या समाधीचे नेमके वर्ष उपलब्ध नाही; परंतु पां० ना० कुलकर्णी ('सेना म्हणे' प्रस्तावना) यांनी समाधीचे साल साधारणपणे इसवी सन १३५८

असावे, असे म्हणले आहे. श्रावण वद्य द्वादशीस त्यांचे अवतार कार्य संपले. आज सेनाजींच्या ज्ञातिबांधवांनी त्यांच्या स्मरणार्थ मठ, मंदिरे व धर्मशाळा बांधल्या आहेत. त्यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार नाभिक संघ करीत असताना दिसतो. सेनाजींच्या मृत्यूनंतर बांधवगड येथे त्यांच्या स्मरणार्थ राजा वीरसिंहाने एक मोठे भव्य-दिव्य समाधी मंदिर बांधले होते आज बांधवगडही ढासळला आहे. मात्र सेनाजींचे समाधीस्थळ एका चबुतराच्या स्वरूपात उरलेले आहे. (संत सेना महाराज, अभंगगाथा संपादक, गुळवणे-शिंदे)

       संत सेनामहाराज व वारकरी संप्रदाय-

वारकरी संप्रदाय म्हणजेच भागवत संप्रदाय होय. या संप्रदायाने महाराष्ट्रामध्ये धार्मिक चळवळ उभी केली; नव्हे आध्यात्मिक चळवळीचे १३व्या शतकातील ते एक केंद्रबिंदू बनले होते. मराठी मुलखात ज्या ज्या सामाजिक सांस्कृतिक व धार्मिक चळवळी झाल्या, त्याची मध्यवर्ती विचारधारा ही वारकरी संप्रदायाचीच होती. ही चळवळ सुरू केली ती ज्ञानदेव-नामदेवांनी, सर्व समाजाला समान पातळीवर आणून अद्वैत तत्त्वज्ञानाची मूळ बैठक देऊन, भक्तितत्त्वाचा गाभा तयार करून, आध्यात्मिक लोकशाहीच त्यांनी निर्माण केली. अशा संप्रदायाशी नामदेव

परिवारातील समकालीन संत यांनी एकत्र येऊन एकजूट बांधली. अशा मक्तिपंयाशी संत सेनामहाराजांचे अतिशय मोठे भावनिक, भक्तिमय संबंध होते, मुळात संत सेनामहाराज महाराष्ट्राबाहेरील हिंदी भाषिक होते की, महाराष्ट्रातील मराठी भाषिक होते, याबाबतीत अनेक विद्वानांमध्ये संशोधक, अभ्यासकांमध्ये मतमतांतरे आहेत. त्यांची मते अभ्यासल्यानंतर वाटते; परंतु क्षणभर समजा सेनाजी उत्तर भारतातील होते असे समजले तरी त्यांची पंढरीच्या विठ्ठलाबद्दल असणारी ओढ त्यांच्या कवितेतून दिसते. तसेच पांडुरंगाच्या उत्कट भक्तिभावना, त्यांनी मराठी भाषेत सहज केलेली अभंगरचना, आपण वाचली तर ते मराठी भाषिक नव्हे तर महाराष्ट्रीय मातीत जन्माला आलेले संत वाटतात. त्यांच्या रचनेचे स्वरूप मराठी भाषा – बोली यांच्याशी त्यांचे असलेले भावस्पर्शी नाते, आपलेपणा प्रत्येक चरणाचरणातून व्यक्त होताना दिसते. सेनाजींचा प्रत्येक अभंग मराठी माणसाच्या मनाला भुलविणारा आहे. वारकरी संप्रदायाचे आद्य दैवत श्रीविठ्ठल याला मध्यवर्ती ठेवून आपल्या अभंगांची निर्मिती केली आहे. अशा सेनार्जींचे संप्रदायाशी नाते अजोड होते. हे निश्चित आहे. सेनाजी महाराष्ट्रातच होते. पंढरीस वर्षातून दोन वेळा साधुसंत येत
. त्यांच्या गाठीभेटी होत असत.

     'जाता पंढरीसी सुख वाटे जीवा।

     आनंदे केशवा भेटताचि।'

संत सेना महाराजांच्या अभंगाचा सखोल भावार्थ: 'जाता पंढरीसी सुख वाटे जीवा। आनंदे केशवा भेटताचि।'

आरंभ (Introduction):

संत सेना महाराज हे वारकरी संप्रदायातील एक महत्त्वाचे संत कवी होते. त्यांच्या अभंगांमधून विठ्ठलभक्तीचा, नामस्मरणाचा आणि पंढरपूरच्या वारीचा महिमा दिसून येतो. प्रस्तुत अभंग हा त्यांच्या भक्तीचे आणि पंढरीच्या ओढीचे एक सुंदर उदाहरण आहे. यात पंढरपूरला जाण्याने मनाला मिळणारा आनंद आणि विठ्ठलाच्या भेटीची आतुरता व्यक्त झाली आहे. हा अभंग केवळ पंढरीच्या प्रवासाचे वर्णन करत नाही, तर तो भक्ताच्या आत्मिक समाधानाचे आणि ईश्वरी भेटीच्या उत्कट इच्छेचे प्रतीक आहे.

अभंगाचा प्रत्येक कडव्याचा अर्थ आणि सखोल विवेचन

मूळ अभंग:
जाता पंढरीसी सुख वाटे जीवा।
आनंदे केशवा भेटताचि।

प्रत्येक कडव्याचा अर्थ (Meaning of each line/phrase):

जाता पंढरीसी सुख वाटे जीवा: पंढरपूरला जाताना (प्रवासात) माझ्या जीवाला, माझ्या आत्म्याला, खूप आनंद होतो.

आनंदे केशवा भेटताचि: आणि तिथे (पंढरपूरला) पोहोचल्यावर आनंदाने केशवाला (विठ्ठलाला) भेटता क्षणी तो आनंद द्विगुणीत होतो किंवा पराकोटीला पोहोचतो.

प्रत्येक कडव्याचे मराठी संपूर्ण विस्तृत आणि प्रदीर्घ विवेचन (Detailed Analysis of each part):

--संकलन
--अतुल परब
--दिनांक-03.07.2025-गुरुवार.
===========================================