काहीतरी करायचं आहे ..........

Started by ankush.sonavane, August 18, 2011, 10:52:48 AM

Previous topic - Next topic

ankush.sonavane

 
भिरभिरणाऱ्या  पाखराला घरट्याकडे जायचं आहे
वादळातील नौकेला किनाऱ्याला न्यायचं आहे.
काहीतरी करायचं आहे .............................

      वाहणाऱ्या मनाला थांबवायचं आहे
      थकलेल्या पावलांना विसावायचं आहे. 
      काहीतरी करायचं आहे .......................

वाळवंटात पाणी शोधायचं  आहे
ओसाड माळरान फुलवायचं आहे.
काहीतरी करायचं आहे ............................

    हरवलेल्या मनाला शोधत फिरायचं आहे
    अमावास्येच्या रात्री चांदण पहायचं आहे.
    काहीतरी करायचं आहे ........................

दुखा:च्या  वाटेवरून सुख: शोधत जायचं  आहे
काटेरी रस्त्यावून चालत  जिवन जगायचं आहे.
काहीतरी करायचं आहे ...............................

                                    अंकुश सोनावणे