मुक्ती

Started by amoul, August 19, 2011, 10:14:50 AM

Previous topic - Next topic

amoul

कामावरून सुटून स्टेशनवर पोहोचलो,
आधीच्या गाडीलाच सुमारे वीस मिनिटे उशीर झाला होता,
त्यामुळे platform  वर आणखीनच गर्दी वाढली होती,
दोन गाड्या सोडल्यानंतर कसाबसा तिसऱ्या गाडीत चढलो.
गाडीला वेग आला होता,
मागना "पुढे चला पुढे चला"चा रेटा देखील निवाला होता,
आणि मग मी हळू हळू उभ्यानेच पण डोळे मिटून तुझ्या आठवणीत बुडालो,
बुडलो काय अगदी हरवलोच,
मग मला सभोवतालची गर्दीही जाणवत नव्हती,
शोरगुल नाहीसा होऊन एकांत जाणवत होता,
धक्के काय असतं ते जणू माहीतच पडत नव्हत,
आणि शेजारचा सारा घामाचा वास नाहीसा होऊन दरवळत होता तो फक्त तुझा perfume
जणू काही मला अलिप्तता आली होती साऱ्यातून,
मी माझ्या शरीरालाही विसरून विदेह अवस्थेत गेलो होतो,
तुझ्या प्रेम भक्तीत इतका बुडलो कि,
तुलाही शरीराची बंधनं होती म्हणून,
नाहीतर तुच आली असतीस मला भेटायला जसा विठ्ठल आला होता तुकारामांसाठी,
मला वाटतं तुकाराम हे सर्वांमध्येच असतात,
फक्त आपला भक्ती करताना विठ्ठल निवडायचा  चुकतो,
नाहीतर वैकुंठ आणि मुक्ती तर क्षणाची भोगतो पण शाश्वतही मिळाली असती.


.......अमोल