आमच्या गावचो गोकुळ कालो

Started by संदेश प्रताप, August 21, 2011, 01:55:06 PM

Previous topic - Next topic

संदेश प्रताप



आमच्या गावचो गोकुळ कालो

आमच्या गावी गोकुळष्टमी मांडावर साजरी केली जाते. मांड म्हणजे सोप्या भाषेत सार्वजनिकरित्या जिथे वाडी तील एकाध्या घरात किव्वा देवळात देवाच्या निवास स्थानी सगळे देवाचे कार्यक्रम केले जातात ती जागा. अष्टमीच्या संध्याकाळी श्रीकृष्णाची मूर्ती आणली जाते. आणि ब्राह्माण येऊन पूजा अर्चा करतात. सर्व स्त्रिया सार्वजनिक पूजा करतात. आणि संध्याकाळी जेवणाच्या वेळी उपवास सोडतात. जेवणाला मुख्य...तहा शेवग्याच्या पानांची भाजी , पो ळया (खापर) हे पदार्थ असतात. रात्री उशिरा पर्यंत भजन चालते. आणि मग दुसर्या दिवशी अंगणात दाहिकाल्याचा कार्यक्रम असतो. सर्व लहान मुले मातीची हांडी घेऊन घरा घरात जातात आणि जमेल तशी दक्षिणा गोळा करतात. मग त्या हांडी मधे दही , दूध वैगरे पंचामृत ओतून त्यात नाणी टाकली जातात. नंतर ही हांडी बांधली जाते. हांडी भोवती सर्व पुरूष मंडळी गोलाकार राहून काही खास गीता नवर्ती नाच करतात. ज्याला आपण नाम सप्ताहात सुधा करतो. " हाता मधे टाळ घ्या, खांद्या वारी वीणा, नाचत पांढरी जावूया, विठ्ठल विठ्ठल गावूया, पाऊस आला चिखल झाला , भिजला हरिचा घडा , विठ्ठल विठ्ठल म्हणा "अशी अतिशय सुंदर रचना असलेली गाणी ऐकायलयावर , नाच न येणारा सुधा थिरकू लागेल. त्यात जर पाऊस असेल तर मग पर्वणीच. शेवटी दुपारी १२ च्या सुमारास हांडी फोडली जाते. मग चिखलात पडलेले पैसे मिळवण्यासाठी झुंबड लागते. कोणाला ५ कोणाला १ कोणाला चक्क २५ नाणी मिळतात. देवाचा प्रसाद समजून ती सांभाळून ठेवली जातत. आणि तिथुनच मिरवणूक मूर्ती च्या विसर्जनला जाते. ...श्री कृष्ण महाराज की जय ...संदेश बागवे