तु!

Started by अमोल कांबळे, August 21, 2011, 04:05:40 PM

Previous topic - Next topic

अमोल कांबळे

तु मृगजळ् सावल्यांचं,
ऊन पडल्यावर उगवणारं
मावळतीला आपल्याच,
सावलीत तुला शोधणारं!
तु मनमोकळा श्रावण,
चिंब चिंब भिजवणारं,
थोडं थांबल्यावरं
इंद्रधनु उगवणारं!
तु भिरभिर पाखरु,
रानोमाळ फिरणारं
असुन घरटं शेजारी
उघी रस्ता हरवणारं!
तु श्वास अंतरीचा,
माझ्यात वाहणारं
धडधड काळजाची,
जिवंत ठेवणारं!

मैत्रेय(अमोल कांबळे)

sindu.sonwane