“आयुष्य खूप सुंदर आहे हे मलाही माहित आहे....”© चारुदत्त अघोर.

Started by charudutta_090, August 22, 2011, 09:53:19 AM

Previous topic - Next topic

charudutta_090

ओम साई
"आयुष्य खूप सुंदर आहे हे मलाही माहित आहे...."© चारुदत्त अघोर.(दि.८/२/११)
ईश्वरी लीला अघाध आहे, हे ग्वाहीत आहे,
निसर्ग शब्दांपलीकडे आहे ,हे गृहीत आहे,
पण ते जीवनी स्वप्नात,कुठे हो खात्रीत आहे,
आयुष्य खूप सुंदर आहे हे मलाही माहित आहे....

किती तरी भावना अशा,ज्या सदा टोचीत आहे,
केवढे नासुरी नियतीचे काटे,जे कायम बोचीत आहे,
का आतले जीवन सहज कोणाशी चर्चित आहे?
आयुष्य खूप सुंदर आहे हे मलाही माहित आहे....

अजून तरी काही प्रतिबिंबित दृश्य,पाणित आहे,
किती दडले हिरे,मनरूपी खाणीत आहे;
उसळत्या वेदना दाबणे हेच,प्रमाण पत्रीत आहे,
आयुष्य खूप सुंदर आहे हे मलाही माहित आहे....

असंख्य यातानांचे जंजाळ,नाजूकधागी वीणीत आहे,
किती साठवले अश्रू ,थिजल्या नजरेत, मेणित आहे;
वरपांगी फाकले ओठ,खरच का हास्य रंगीत आहे,
आयुष्य खूप सुंदर आहे हे मलाही माहित आहे....

काय प्रत्येक दिवसाचं आखलं पान,फक्त गुणित आहे,
कायम गुंतले नाते,मोती सराच्या कोणत्या मणीत आहे; 
दैनंदिन घटना पुस्तक,फक्त "त्याच्याच" सहि गुणीत आहे,
आयुष्य खूप सुंदर आहे हे मलाही माहित आहे....

एखाद्या काव्य-मनी रुग्णाला,कोणता वायू श्वासित आहे,
काय आहे जगी जे आजन्म आश्वित आहे;
रसना,वासना बरोबर यातना,हे निश्चित आहे,
आयुष्य खूप सुंदर आहे हे मलाही माहित आहे....

तरीही म्हणायचे आयुष्य खूपच सुंदरीत आहे,
सगळं काही होकारात्माकच दृष्टीत आहे;
कसं सांगावं,मृगजळी सर्वच फसवीत आहे,
आयुष्य खूप सुंदर आहे हे मलाही माहित आहे....

या वेड्या मते,हे संगीतरूप प्राणायामी तालीत आहे,
ब्रम्हस्माच्या वलायित सदैव "अहंमित" आहे;
वीलवून चरणी त्याच्या,स्वयं प्रकाश ओंकारित आहे,
आयुष्य खूप सुंदर आहे हे मलाही माहित आहे....
चारुदत्त अघोर.(दि.८/२/११)

Gaurav Patil