कविता

Started by केदार मेहेंदळे, August 22, 2011, 12:56:19 PM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे


मनात येते कविता तर नसत पेन,
पेन असत तर जाते मनातून कविता.
खरच कशी बनते कविता?

कधी शब्द सुचतात आधी, कधी विषय.
सुचली कि मात्र रहावत नाही
कागदावर उतरल्या शिवाय.

बोलावून आणतो मग मी शब्दांना
अन बसवतो त्यांना लाईनीत दामटवून
एका पुढे एक.

माहित नसत मला कशी दिसेल कविता
पण कशीही दिसली तरी आवडते मला,
जस मुल आईला.

कधी पाया बनवताना  लिहितो कळस
अन त्या पायाच्या कळसा वरच 
उभी रहाते कविता.

मी आपला लिहित सुटतो सुचेल ते
अन वाचून बघतो तेंव्हा मनात येत
खरच कशी बनते कविता?


केदार......

संदेश प्रताप


amolkash

खूपच छान!!!!

खरच कविता लिहिताना असच काहीतरी होतं!!!!!!!!