रेव पार्टी (लावणी)

Started by बाळासाहेब तानवडे, August 22, 2011, 02:43:17 PM

Previous topic - Next topic

बाळासाहेब तानवडे


रेव पार्टी
(लावणी)
ती: टेनटी फोर सेवन कामाचं आलं बाई फॅड.
जादा पैक्यापाई झाल्यात आता समदीच मॅड.
सीसीडी अन् बरिस्त्यात रंगत्यात गप्पांच  फड.
मी म्हणती जाईन पर दाजीबाच अडतंय घोड.

कोरस:काम लई झालं बाई आता इक एंड आला.
लवकर चला बाई आता बिगी-बिगी चला.
पोर चालल्यात धमाल  रेव पार्टीला.
ती: सख्या चल , राया चल जाऊ अपुनबी त्या रेव  पार्टीला || धृ ||

पोरा – पोरींच फेसबुक असतंय.
टीवटर आणि आर्कुटबी असतंय.
म्हण तेच्यावर गुलूगुलू करत्यात.
रेव पार्टीला जागी एका जमत्यात.
धूम धमाल असते मौज मस्तीला.
सख्या चल , राया चल जाऊ अपुनबी त्या रेव  पार्टीला||१||

कोरस: काम लई झालं बाई आता इक एंड आला.
लवकर चला बाई आता बिगी-बिगी चला,
पोर चालल्यात धमाल  रेव पार्टीला.

ती: हातामंदी हे हात कीव धरू.
डोळ्यामंदी हे डोळ कीव भरू.
डान्स धमाल डिस्को करू.
पार्टीमंदी त्या खान-पिणं करू.
नसल हद्द त्या मादक धुंदीला.
सख्या चल , राया चल जाऊ अपुनबी त्या रेव  पार्टीला||२||

कोरस: काम लई झालं बाई आता इक एंड आला.
लवकर चला बाई आता बिगी-बिगी चला,
पोर चालल्यात धमाल  रेव पार्टीला.

शाहीर : बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब तानवडे – २२/०८/२०११
http://marathikavitablt.blogspot.com/
http://hindikavitablt.blogspot.com/
   

केदार मेहेंदळे


बाळासाहेब तानवडे

केदार.
उत्कृष्ठ अभिप्रायाबद्दल खुप धन्यवाद.

बाळासाहेब तानवडे


Dear Mr. Tage

"पावन ,अभिप्रायाच असच फेट उडवीत जावा. आमालाबी मग लिवायला हुरूप येतो वो"
 
अभिप्रायाबद्दल खुप आभार. 

idlidu

Lavni chi Chal lawali ahe kaa? Hya lavni cha apan picturization suddha karu sakto. Interested asal atar nakki kalawa.
idlidu - Connecting artists with audiences...