अश्रूंची आर्तता

Started by Saee, August 24, 2011, 01:48:11 PM

Previous topic - Next topic

Saee

सारेच म्हणती आज मला,
नको ओघळू देऊस ते,
वीश असे ते भावनांचे,
लोकं म्हणती, ते आसू नव्हे.

मी हि केला वार ऐसा,
पालटूनी त्यांच्यावरी,
धैर्य लागते मी म्हणाले,
मोकळे पणाने रडण्यासही.

देतील सारे ते म्हणाले,
सहानुभूती रडता अशी,
ठेव जपुनी संचित सारी,
तुझी व्यथा, तुझियापशी.

दिसून गेली माझ्या मनाला,
दांभिकता त्या शब्दांमध्ये,
दिसेल कैसे, वाटले तयांना,
आर्त माझ्या आसवान मध्ये.

खोटे पणा हा दाखवाया,
त्यांच्या मनी मी डोकावले,
काय सांगू साऱ्यांनाच मी,
तेथे रडताना पहिले.

घाबरूनी सारे म्हणाले,
नको बोलू, जे पहिले,
सहानुभूती नको आम्हाला,
म्हणुनी सारे ओशाळले.

काय बोलावे मी ह्यावर?
निशब्द मी परतले,
झले रिती मी मुक्त रडूनी,
जग सारेच आतून घुस्मटले.

Gyani

 :) खूप छान शब्द मांडले आहेत. अप्रतिम आणि  जर नावंच सुचवायचे असेल तर,  "अश्रूंची आर्तता ". बघा कसे वाटते.

Saee

Thanks for your compliments ani mala chan naav suchawlya baddal. :)

amoul

धैर्य लागते मी म्हणाले,मोकळे पणाने रडण्यासही. khupach khara  aahe he!!!

खोटे पणा हा दाखवाया,त्यांच्या मनी मी डोकावले,
काय सांगू साऱ्यांनाच मी,तेथे रडताना पहिले.

hya oli hi khupach bhavalya .... khupach chhan kavita