भुलावा

Started by शिवाजी सांगळे, July 25, 2025, 03:42:08 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

भुलावा

"चंचल हे मन माझे" न्
भुलावा हा भवसागर रे
जाईल कुठे प्रवास हा
वेळीच आता तु सावर रे

स्वार्थी मन, दुष्ट कधी
स्व:ता पुढे, का जाईना रे
इथवर येणे,बहू जाहले
योग्य सन्मार्ग तु दाखव रे

मग्न जे अंतरजाली
वास्तव त्यांसी दावशिल रे
क्षणभंगुर मोह माया
तीतून आता तुच सोडव रे

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९