गणपतींचे काही नवीन प्रकार

Started by designer_sheetal, September 08, 2011, 04:20:58 PM

Previous topic - Next topic

designer_sheetal

http://designersheetal.blogspot.com/

वेळ बदलली काळ बदलला तसे गणेशोत्सवाचे स्वरूपही बदलले. १० वर्षांपूर्वीचे गणपती आणि आताचे गणपती यांच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. अर्थात गणपती नाही बदलले माणसं मात्र बदलली. माणसांनी गणेशोत्सवाचं स्वरूपही बदललं. पूर्वी दूरवर एखाद्या गल्लीत सार्वजनिक गणपती असायचा. आजकाल गल्लोगल्ली असतात. घरगुती गणपतीही आजच्या एवढे नक्कीच नव्हते. माझ्या पाहण्यात आलेले हे काही गणपतीचे विशेष प्रकार:

१. पारंपारिक गणपती:
वंश-परंपरेनुसार चालत आलेला हा गणपतीचा प्रकार. यामध्ये वडलोपार्जित गणपती पूजला जातो. इथे सजावटीला विशेष महत्व दिलं जात नाही मात्र गणपती घरी असेपर्यंत त्याची पूजाअर्चा विधिवत कशी होईल यावर जास्त भर दिला जातो. प्रसाद म्हणून जास्तीत जास्त लोक जेवून किवा तृप्त होवून कसे जातील यावर विशेष लक्ष दिलं जातं.

२. पारंपारिक गणपती मध्यमवर्गीयांचे:
यामध्ये सजावटीला विशेष महत्व दिलं जात. थर्माकोल, लाईट्स, फुलं decoration साठी वापरली जातात. पूजा १००% विधीवतच झाली पाहिजे असा यांचा अट्टाहास नसतो. आपल्याला जमेल, वेळ मिळेल तशी पूजा-अर्चा पाहिली जाते. घरी आलेल्या पाहुण्यांचे चहा, सरबत, चिवडा, लाडू वा इतर फराळ देवून आदरातिथ्य केले जाते.

३. पारंपारिक गणपती श्रीमंतांचे:
यामध्येही सजावटीला विशेष महत्व दिलं जात. गणपतीचा नुसता मखरच नाही तर गणपती ठेवायची पूर्ण खोलीच सजवली जाते. सिल्कचे पडदे, महागडी फुलं(लिलीअम्स, कार्नेशंस), उंची अगरबत्या किवा सुवासाची मशीन, चांदीचा पाट किवा चौरंग, चांदी व सोन्याची पूजेची भांडी आदींनी श्रींची शोभा वाढवली जाते.

गणपतीचे दागिनेही विशेष करून सोन्याचांदीचे असतात. गणपतीच्या हातातील मोदकही सोन्याचा किवा चांदीचा असतो. (लोकं कितीही श्रीमंत झाली तरी सोन्याचांदीचा भात जेवू शकत नाही तर गणपती सोन्याचांदीचे मोदक कसे खावू शकतात ते देवच जाणे!)

यांच्याकडे फारसे पाहुणे येत नाहीत. जे येतात ते appointment घेवून येतात. उंची पक्वानांचा देवाला नैवेद्य दाखवला जातो मात्र तो घरातल्यानपुरताच असतो. बाहेरच्या लोकांना इथे तीर्थप्रसादा व्यतिरिक्त काही मिळत नाही. पहिल्या दिवशी गणपतीची विशेष देखभाल केली जाते दुसरया दिवशी पासून घरातली बिझी माणसे आपआपल्या कामाला गेल्यावर गणपती AC Hall मध्ये एकटाच असतो.

४. नवसाचे गणपती:
हे गणपती वडलोपार्जित आणलेले नसून नवस पूर्ण झाल्यावर किवा मनातील एखादी इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आणले जातात. हे साधारण मर्यादित कालावधीसाठी आणले जातात. याचे स्वरूप वरील पैकी कुठलेही एक असू शकते.

५. नवसाला पावणारे गणपती:
हे गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये पहायला मिळतात. हे काही लोकांच्या नवसाला पावतात. विशेष म्हणजे यातील काही लोकांच्या घरीही गणपती येतात, काही लोकं रोज घरी देव्हारयातील
गणपतीला पूजतात पण बाहेरचेच गणपती यांना पावतात. इथे सजावट आणि publicity ला भरपूर महत्व असतं. गणेश चतुर्थीच्या आधी लोकांच्या अगोदर media ला याचं दर्शन दिलं जातं आणि marketing केलं जातं. हि पावणारी मंडळ गणपतीसाठी खर्च करताना अजिबात मागे पुढे पहात नाहीत. पावलेली लोकंही मग सढळ हस्ते गणपतीच्या चरणी आपल्याला जमेल तितकी संपत्ती अर्पण करतात. हीच संपत्ती पुढे जनहितासाठी वापरली जाते(?)

६. हौस म्हणून आणलेले गणपती:
हा हल्ली या ४/५ वर्षांमध्ये सुरु झालेला प्रकार आहे. या प्रकाराची उत्पत्ती "आमच्या घरी गणपती असते तर कित्ती छान झालं असतं" या लोकांच्या हौसेतून झाली. त्या नुसार ज्याला आवडेल तो आजकाल गणपती आणू शकतो. अगदी २ सख्ख्या भावांच्या घरीही २ वेगळे गणपती असू शकतात.

७. हाय-टेक गणपती:
हे प्रकार मुख्यतः NRI लोकांकडे आढळतात. परदेशात पुजारी मिळणं कठीण असल्यामुळे गणपतीची पूजा वेबकॅम द्वारे किवा पूजेची CD लावून केली जाते. हे गणपती जास्ती करून दीड दिवसाचे असतात.

टीप: वरील लेखात कुणाच्याही भावना दुखवण्याचा हेतू नाही. हे फक्त माझं observation आहे आणि ते माझ्यापुरतच मर्यादित आहे.

शीतल
http://designersheetal.blogspot.com/

संदेश प्रताप

क्या बात....अतिशय छान रित्या मांडलय , उत्तम निरीक्षण ..मोरया


pomadon

सुरेख अप्रतिम धन्यवाद .....
 

rudra