कळलंच नाही मी केंव्हा प्रेमात पडलो.............

Started by ankush.sonavane, September 13, 2011, 01:09:28 PM

Previous topic - Next topic

ankush.sonavane

माझी प्रियेसी मला दुख देवून निघून गेली होती
दुखी मनाला सावरायला कोणीतरी आली होती
कळलंच नाही  मी केंव्हा प्रेमात पडलो.............

     ठरवलं होत आता प्रेम वैगरे काही करायचं नाही
     कुणालाही आपल्या जवळ येवू दयायचं नाही
     कळलंच नाही  मी केंव्हा प्रेमात पडलो..............

शब्दाने शब्द वाढत गेला श्वाशात  श्वास गुंतत गेला
भावनांचा खेळ चालू झाला माझा मलाच विसर पडला
कळलंच नाही  मी केंव्हा प्रेमात पडलो..............

       एक दिवस मला ती भेटायला आली होती
       डोळ्यात पाहत माझ्या काहीतरी बोलत होती
       कळलंच नाही  मी केंव्हा प्रेमात पडलो..............

बंद करून डोळे सर्व काही पाहत होतो
उघडताच डोळे खाटेवरून खाली पडलो होतो
कळलंच नाही  मी केंव्हा प्रेमात पडलो.............. 
                                       अंकुश सोनावणे