सुख

Started by संदेश प्रताप, September 15, 2011, 12:17:30 AM

Previous topic - Next topic

संदेश प्रताप



तिने विचारलं अरे सांग ना ?? सुख म्हणजे नक्की काय असतं???

मी म्हटलं

तुझ सकाळी भिजलेल गोंडस रूप असत............

ती पुन्हा चिडून म्हणाली अरे सांग ना???


मी म्हटलं

तुझ अस लटक रागावण खूप असतं

आता मात्र अबोला, मी सुधा जरा मुद्दाम हटून बसलो

संध्याकाळी मात्र तिला राहवल नाही...

डोळ्यात पाणी आणून घट्ट मिठी मारली तिने

मी हलकेच अश्रू पुसले , आणि म्हणालो

आता तरी कळलं का सुख म्हणजे नक्की काय असत?

ती हसली आणि म्हणाली हो... मी म्हटलं काय???

माझे अश्रू पुसायला तू माझ्या जवळ असण .....नसलेला दुरावा सुधा सहन न होणं...हेच माझ सुख :)






mahesh4812


संदेश प्रताप