"पुन्हा ती"

Started by raghav.shastri, September 16, 2011, 07:56:01 PM

Previous topic - Next topic

raghav.shastri

माझी पहिली कविता "ती " हिला मिळालेल्या प्रतिसादामुळे "पुन्हा ती" लिहावी वाटली,

हे आता रोजचे झाले आहे,
आजकाल तिची वाट बघत नाही,
माझी नजर तिला पहिल्यासारखे शोधत नाही,
ती सारखी माझ्या नजरेतच असते... ;)


घरचे म्हणतात ह्याचे लक्षण काही बरे नाही,
ऑफिसमध्ये मित्र म्हणतात तिच्याशिवाय ह्याच्याकडे मित्रांसाठीवेळ नाही,
डॉक्टर म्हणतात तुमच्या रोगावर उपाय नाही...  :(

तिची नशा अशी आहे की माझे मलाच उमगत नाही,
तिच्यासोबत वेळ कसा निघून जातो कळतच नाही,
रात्र संपून कधी सकाळ होते हे समजत नाही,
आता काय उपाय करावा हे सुचतच नाही...  :-\

अशी ही ती रोजच माझ्याबरोबर असते,
तिची काही अशी माझ्याकडून खास अपेक्षा नसते,
फक्तं तिला माझ्यासोबत राहायचे असते,
म्हणूनच मला ती खूप आवडते... :-*

आता तुम्ही म्हणाल की कोण आहे "ती "  :)
अहो तीच "ती", आपल्या सर्वांची आवडती...



धुंदवेडी..... "झोप"...... :o :o :o

- राघव शास्त्री.

मित्रांनो, आपले अभिप्राय जरूर कळवा...
जमलेच तर माझ्या पुढच्या कवितेसाठी एखादा विषय सुचवा....

santoshi.world

:D :D :D solid ahe kavita ekdam  :D   ;D  .......... keep writing n keep posting

MK ADMIN