"तू.....!"

Started by msdjan_marathi, September 18, 2011, 03:38:30 PM

Previous topic - Next topic

msdjan_marathi

(प्रस्तुत कविता हि स्वप्नील बांदोडकर यांच्या "ये,ये,ये ना प्रिये..." या गाण्यातील 'तू समोर असताना....' या अंत-यापासून प्रेरित होऊन लिहिली आहे... तेव्हा त्या चालीत गाण्याचा प्रयत्न केल्यास नक्की आवडेल.....!)
;)"तू.....!";)
तू लडिक लाजताना खुलते गाली खळी,
गंधलेल्या फुलांची हसते हरेक पाकळी...
आसुसलेल्या पाखरांना खबर कशी लागली,
गोड गोड मकरंदाची चव त्यांनी चाखली...!

तू मला पाहताना भाळी बट हि लाटली,
हळूच नाटी त्रासून तू कानी तिला घेतली...
पाहुनी हे दृश्य ह्रिदयी घालमेल वाढली,
निमिषभर काळजाला ती कटार वाटली...!

तू दबुन बोलताना बोलली नयनबाहुली,
ओठांनी तुझ्या आपसातील गाठ आप सोडली...
शिंपल्यातील शुभ्र मोत्यांची नजर मज जाहली,
डोही जणू हंसांची माळरांग भासली...!

तू
वळून चालताना दिशाही मागे चालली,
तुझ्या पावलांच्या ठश्यांवर सांजेने कात टाकली...
आकाशी मग चांद आणि चांदणीही सांडली,
काळ्याभोर अंगणात रांगोळी छान मांडली...!
                                              ...........महेंद्र ;)