ओढ माझिया प्रियेची!

Started by अमोल कांबळे, September 26, 2011, 01:14:22 PM

Previous topic - Next topic

अमोल कांबळे

अवखळ पाऊस आला मन पाणी पाणी झालं
कातरवेळी आठवणिच्या कात्रीत अडकल्यासारखं झालं
डोळे तुझी वाट पाहु लागले
उगाच काहीतरी हरवल्यासारखं झालं
लाटांचा आवाज ऐकत रहावं
वाळुत रेघोट्या मारत रहावं
कधी सागराचा राग आला
किनार्यावरचे खडे संपल्यासारखं झालं
ऊनं कलु लागतात
आवाज येऊ लागतात
तु आलीयेस, तुझी चाहुल आल्यासारखं झालं
तु येतेस, अगदी शांत
विचारतेस, कधी आलास?
मी म्हणतो , आत्ताच।
उगांच खोटं बोलुन आभाळ दाटुन आल्यासारखं झालं
पावसानं परत मदतीला येणं
त्याला चुकवताना तिझं मला खेटणं
तिच्या मदस्पर्शानं
मद्य पिल्यासारखं झालं
ओल्या मिठीत ओल्या सखीच्या
प्रणयात विरघळल्यासारखं झालं!




मैत्रयामोल!