राणीचा बाग

Started by madhukarsawant, September 30, 2011, 02:08:10 PM

Previous topic - Next topic

madhukarsawant


छान! छान! छान! किती राणीचा बाग
चाल आई , जाऊ बघ पिंजर्यातला वाघ !!
हत्तीच्या अंबारीत , बसण्यात वाटे मौज
पहा कशी दाटून बसली मुलांची फौज !!
हरण, माकड, उंट, घोडे,  किती प्राणी इथे
जिराफाची मान किती उंच उंच जाते !!
जंगलातील पक्षी - प्राणी, इथे दिसती सारे
जंगलातला राजा, इथे पिंजर्यातच फिरे !!
अशी आहे छान बाग, मजा इथे वाटे
सांग आई! सांग! पुन्हा
येऊ कधी इथे !!

कवी : मधुकर परशुराम सावंत
प्रकाशन : दशभुजा प्रकाशन

केदार मेहेंदळे