"तुझ्यात मी, अन् माझ्यात तू....!"

Started by msdjan_marathi, October 01, 2011, 04:20:57 PM

Previous topic - Next topic

msdjan_marathi

( आपल्या नवीन संसाराला सुरुवात केल्यावर, त्यांच्यातील 'मी' आणि 'माझं', हे शब्द 'आम्ही' या शब्दात एकवटतात.... त्यावेळी त्यांची स्वप्ने, आयुष्ये.... एकूणच दोघांचं पूर्ण जीवन हे या अक्षरांत एकवटतं.... आणि मग दोघं एकत्र सारी स्वप्नं बघतात....!)
:-*"तुझ्यात मी, अन् माझ्यात तू....!":-*

तुझ्यात मी, अन् माझ्यात तू... एकमेकांत मिसळून जाऊ...
माझं 'मीपण', तुझं 'तूपण'... सारं सारं विसरून जाऊ...
'राजाराणी' चा संसार करू... चटणी-भाकर एकचं खाऊ...
झोपडीवजा महाल आपुला... आनंदाने नांदत राहू...
गुलाबलेल्या गोड क्षणांची... शिदोर ऊरी बांधून घेऊ...
कडवटलेली खट्ट् आसवे... हळूच गटकन् पिऊन जाऊ...
तुझ्यात मी, अन् माझ्यात तू... एकमेकांत मिसळून जाऊ...! :-*

ऋतू अनेक आयुष्यातले... दोघे एकां डोळी पाहू...
श्रावणातली शिरशिर गाऊ... वैशाखाचा वणवा साहू...
सांजकाळची उधाण मैफिल... एकमताने समरस होऊ...
टपोर चांदण लखलख् शीतल... शीतलतेत शांत सुखाऊ...
भविष्यातल्या साज चुलीला... रसरस् स्वप्ने निखार देऊ...
करुनी वल्हे हातांची... हीं निनाद नौका पार लगाऊ...
तुझ्यात मी, अन् माझ्यात तू... एकमेकांत मिसळून जाऊ...! :-*
                                                                .........महेंद्र ;D