संत सेना महाराज-ऐका म्हणा रामनाम। वाल्ह्या उच्रला अघम-1

Started by Atul Kaviraje, August 22, 2025, 09:49:42 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                          "संत चरित्र"
                         ------------

        संत सेना महाराज-

समाजाची फसवणूक करून संपत्ती कितीही वाढविली, माणसाच्या रामबोलो समयी त्या धनाचा काही उपयोग होत नाही. प्रत्येक मनुष्य जन्माला आला की एकटाच जन्म घेतो, काहीही न आणता, आणि मरणाच्या दारी गेला तरी अंकिचन पणाने एकटाच जात असतो. येथे केवळ आपल्यासमवेत ईश्वर असतो. त्याचे मनापासून स्मरण करा, या विश्वात परमात्म्यावाचून आपणास गती नाही. त्याचे नामस्मरण करा, अंतिम समयी तोच तुम्हाला साहाय्य करील. सेनाजी समाजाप्रती बोध करताना म्हणतात,

"प्रपंच हा वरून चमकदार दिसतो. आतून मात्र एखाद्या भ्रमाच्या भोपळ्या- सारखा भ्रामक व कडू, मनुष्य त्यात वरवर चांगला दिसत असल्याने तो नेहमी गुंतत जातो. पत्नी मुले-मुली, बंधू-भगिनी, नाती-गोती ही सुख देणारी साधने असली तरी ती अंतकाळी व्याधिग्रस्त होतात, कोणी कामास येत नाहीत. आपल्या व्याधीसमयी वाटेकरी न होता दूरावलेली असतात. अशा समयी नारायण आठवतो. सुखाच्या समयी ईश्वरचिंतन नसते. प्रत्येक माणसाने आपला स्वधर्म पाळावा.

"नशिबामध्ये जे कर्म असेल ते आपण केले पाहिजे. त्यामध्ये प्रत्येकाचे हित आहे. आपली आई कुरूप असली तरी तिच मुलाचे खरे जीवन असते. एखाद्या सुंदर अप्सरेसारखी सुंदर स्त्री आहे, तिचा मुलाला काय उपयोग ? जसे माशाचे जीवन पाण्यातच सुखाचे होईल, तुपाच्या डोहात त्याला सोडले तर त्याचा जीव

जाईल, म्हणून प्रत्येकाने आपला धर्म कोणता, है ओळखले पाहिजे." इतक्या सहन सोप्या शब्दांमध्ये आध्यात्मिक तत्त्वाचे उद्बोधन सेनाजी सहजपणे करतात.

सेनाजींनी संतसंगामध्ये कीर्तन महत्त्वाचे समजले आहे. कारण तत्त्व श्रवण करताना चित्ताची एकाग्रता होते; परंतु कीर्तनामध्ये गप्पा मारणारांचा, पान खाणारांचा सेनाजी धिक्कार करतात. अशा लोकांची जे संगती करतात. त्यांना सद्गती मिळत नाही, नरकात जागा मिळते. म्हणून ते म्हणतात, नामसंकीर्तन हे जिवाचे उद्धार करणारे फार मोठे साधन आहे. पौराणिक दाखल्याचा आधार घेऊन

 पुढील अभंगात सेनाजी सांगतात,

     "ऐका म्हणा रामनाम। वाल्ह्या उच्रला अघम।

     विष दाह झाला तो शिवा। रामनामे शांत तेव्हा राम अक्षरे सेतुतरे।

     बिभिक्षण तो राज्य करे।। सेना महणे रामभक्ता। द्रोणागिरी जो आणीत ॥"

ऐका म्हणा रामनाम। वाल्ह्या उच्रला अघम।
या ओळीत, 'वाल्ह्या' म्हणजेच वाल्या कोळी याला 'अघम' (पापी) असे संबोधले आहे. असे सांगितले जाते की, वाल्या कोळीला 'राम' म्हणता येत नव्हते, म्हणून त्याने 'मरा, मरा' असा जप केला आणि नंतर तोच जप 'राम, राम' असा झाला. याच रामनामाच्या प्रभावामुळे तो एक महान ऋषी, म्हणजेच महर्षी वाल्मिकी झाला.

विष दाह झाला तो शिवा। रामनामे शांत तेव्हा राम अक्षरे सेतुतरे। बिभिक्षण तो राज्य करे।।
या ओळींमध्ये, रामनामाच्या सामर्थ्याचे वर्णन आहे. 'विष दाह झाला तो शिवा' म्हणजे, समुद्रमंथनातून निघालेले विष शंकराने प्राशन केले, तेव्हा त्या विषाचा दाह रामनामामुळे शांत झाला. तसेच, 'राम अक्षरे सेतुतरे' म्हणजे, राम हे नाव कोरलेले दगड समुद्रावर तरंगले आणि त्यांच्या मदतीने रामसेतू बांधला गेला. 'बिभिक्षण तो राज्य करे' म्हणजे, रावणाचा भाऊ विभीषण याने रामभक्ती केली, म्हणून त्याला लंकेचे राज्य मिळाले.

सेना महणे रामभक्ता। द्रोणागिरी जो आणीत ॥"
इथे 'सेना' हे नाव आले आहे, पण हे संत सेना महाराज यांचे नाव आहे, असे निश्चित सांगता येत नाही. या ओळीत हनुमानाने द्रोणागिरी पर्वत आणल्याचा उल्लेख आहे, जो रामभक्तीचे प्रतीक आहे.

🙏 संत सेना महाराज यांचा अभंग – सखोल भावार्थ व विस्तृत विवेचन
🌼 आरंभ (Introduction):

संत परंपरेतील एक थोर संत म्हणजे संत सेना महाराज. पेशाने न्हावी असलेल्या या संताने अध्यात्मात अतिशय मोठी उंची गाठली. त्यांचे अभंग सुलभ भाषेत, परंतु अत्यंत गहिरा अर्थ सांगणारे आहेत. त्यांनी आपल्या अभंगातून नामस्मरण, भक्ती, आणि प्रभुरामाचे गुणगान यांचा प्रभावशाली महिमा सांगितला आहे.

खालील अभंग हा रामनामाच्या प्रभावावर आधारित असून, तो भक्तीमार्गाच्या सामर्थ्याचे उत्कृष्ट उदाहरण आहे.

📜 अभंग:
ऐका म्हणा रामनाम। वाल्ह्या उच्रला अघम।

विष दाह झाला तो शिवा। रामनामे शांत तेव्हा राम अक्षरे सेतुतरे।

बिभिक्षण तो राज्य करे।। सेना महणे रामभक्ता। द्रोणागिरी जो आणीत ॥

--संकलन
--अतुल परब
--दिनांक-22.08.2025-शुक्रवार.
===========================================