ऐतिहासीक पुणे

Started by RohitDada, October 03, 2011, 02:04:45 PM

Previous topic - Next topic

RohitDada

ऐतिहासीक पुणे


मला ऑफिसला जाताना जाणवले की ऐतिहसीक पुणे हे अजुनही ऐतिहासीकच आहे.

मी जेव्हा ऑफिसल बाईकवरून जात होतो तेव्ह मला अचानक वाटायला लगले की मी बाईकवर नाही घोड्यावर बसलेलो आहे. त्याला कारणही तसेच होते. एकतर पहाटेची ड्युटी असल्याने सर्वत्र अंधार होता आणि आपल्या कर्तव्यदक्ष सरकारी कर्मचाऱ्यांनी सकाळी साडेपाचलाच स्ट्रिटलाईटस बंद केले होते. त्यामुळे रस्त्यावरच्या खड्ड्यांचा अंदाजच येत नव्हता. या खड्ड्यांमुळे मणुस गाडिवर सारखा उडत राहतो. हळुहळू त्या उडण्यातसुद्धा एक प्रकारची लय निर्माण होते आणि त्याला घोडेस्वारिचा फील येतो. आहे की नाही गंमत ?

या विचारांबरोबर मला आणखिही काही जणवू लागले, माझ्या डोक्यावरचे हेलमेट मल शिरस्त्राणाप्रमाणे भासू लागले. अंगातले जर्कीन मला चिलखताप्रमाणे वाटले. फार काय मझ्या खिशातला मझा मोबाईल म्हणजे तलवार तर नाही ना यची सुद्धा मी खात्री करून घेतली.

या प्रसंगामुळे आपल्या सरकारने पुण्याचा जो ऐतिहासिकपणा जिवंत ठेवला आहे त्याची मला जाणीव झाली. अशा या सरकारचे, या सिस्टिमचे आभार कोणत्या शब्दात मानवे हेच कळत नाही.

जय भवानी !!! जय शिवाजी !!!
हर हर महादेव !!!