मनाच्या पटलावरून थोडंस...

Started by jayashri321, October 08, 2011, 08:43:53 PM

Previous topic - Next topic

jayashri321

                                               
हा लेख आहे की नाही याबद्दल मलाच थोडी शंका आहे!!!!
आज मनातल थोडस बोलायचय..पण नेहमीप्रमाणे ते कवितेच्या भाषेत नाही,म्हणून हा 'लेख' लिहण्याचा प्रपंच...
पहिला प्रश्नच आहे, आज कितीवेळा स्वतःसोबत खोट बोललात???
कितीवेळा स्वतःच्या मनाच समाधान करुन घेण्यासाठी आतल्या खर्‍या आवाजाला दडपून टाकलत???
आणि सगळ्यात महत्त्वाच , आज कितीवेळा मनापासून हसलात?? :)

आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं थोड्याफार फरकाने सारखीच असतील्...कारण आपण सगळेच धावतोय ना??? जग स्पर्धेच आहे ना???
पण धावता धावता जाणवतं का कधीतरी ,आपण काहीतरी खूप महत्त्वाचं मागे सोडून पळतोय..
कळेल तेव्हा कदाचित ते 'काहीतरी'  अदृश्य झलेलं असेल!!!
धावता धावताच कधीकधी गमावतो आपण आपल्या आतला एक निर्व्याज आनंद्,कारण हल्ली आपलं हसण वस्तूनिष्ठ होत चाललय्!!हो ना? :o
हल्ली लिहावं म्हट्ल तर शब्द सुचत नाहीत अन् शब्द सुचतात तेव्हा धावत असल्या कारणाने ते हवेतच विरुन जातात्..अन् आपल्याला कळतसुद्धा नाही.. :(
आपण जास्तवेळ काय करतो?? दुसर्‍यामधल्या चुका शोधत राहतो,आपल्याच माणसांना शब्दांच्या धारेने जखमी करत राहतो!अन स्वतःही रक्तबंबाळ होत राहतो!स्वतःतल्या मीपणाला जपता जपता स्वतःलाच हरवून बसतो..

म्हणूनच....
थोडं मागे वळून पाहा,थोडं थांबा...स्वतःला क्षणभर विश्रांती द्या.थोडी ताजी हवा उरात भरुन घ्या ,नवीन जोमाने पळता येण्यासाठी.
शब्द कधी मनात जुळलेच तर त्यांना लेखणीतून उतरु द्या 'वेळ नाही' हे विसरुन!!
आणि हो..एक खूप खूप महत्त्वाचं!!! तुमच्यावर नि:स्वार्थ प्रेम करणार्‍या तुमच्या माणसांना हे कळूद्या की तुमचही त्यांच्यावर तितकच प्रेम आहे! हे खरं की सगळं काही शब्दात बोलण गरजेच नाही तरी एकदा बोलून तर पाहा...तुम्हाला खुप हलकं वाटेल्..अन् ऐकणार्‍याला होणारा आनंद तो तर त्या व्यक्तीच्या डोळ्यातच पाहा!!!
आज रात्री तुमच्या गोड आईचा एक गोड गालगुच्चा घेऊन पाहा!!
उद्या लवकर उठायचय हे विसरुन थोडं स्वप्नात हरवून पाहा....थोड वाट सोडून रानावनात भटकून पाहा..
स्वतःचचं एकदा कौतुक करुन पाहा,स्वतःलाच आरशात पाहून एकदा खूप हसून पाहा..
life is juz 1ce yar!!! live it love it!!! alll D beSt gUysss...
lOve U life..... enjOyyyyyyyyyyyy  :) ;D :D ;D <3