मला प्रेम होत आहे

Started by maddyloveu, October 11, 2011, 04:45:27 PM

Previous topic - Next topic

maddyloveu

कधी कधी वाटे तुला फक्त बघत राहावे,
मनी माझा काय चालले ते फक्त तुलाच कळावे,

वाटे एका क्षणात दूर करावी सर्व बंधने,
पण जवळ तुझा येताच वाढतात का रे स्पंदने?,

कधी कधी वाटे असे का होत आहे,
आज मला कळले मला प्रेम होत आहे,
मला प्रेम होत आहे...

                                                ......मिथुन पाटील