'जीव काकुळतं आला...!'

Started by msdjan_marathi, October 15, 2011, 01:08:19 PM

Previous topic - Next topic

msdjan_marathi

(संक्षेप: 'त्याचे'... तिच्यावर खूप प्रेम होते... पण त्यांच्या नशिबी एकत्र येण नव्हतंच...! अखेर विनापर्यायी त्याने स्वताहून तिला दूर केलं.... आणि स्वतःला नशिबाच्या हवाली केलं.. पण नशिबाने त्याला खूप खेळवलं... नव्हे..... खेळवतयं..! त्याचा प्रवास अजूनही पूर्ण झाला नाही.... त्याला होणारा त्रास मी इथे काही संक्षिप्त ओळींत मांडण्याचा प्रयत्न केला आहे.... कवितेचा शेवट मी नाही करू शकलो... कारण... हा शेवट होऊच शकत नाही....! बघू शेवट कसा होतो ते....?)
:'('जीव काकुळतं आला...!' :'(
जीव काकुळतं आला... जीव काकुळतं आला... :'(
देत भयाण कातर दिस मावळत गेला...!
पुन्हा तेच तेच सारे... मनी झोंबतात वारे...
व्रण उसवून हे...रे..... क्षण विव्हळत गेला...!
जीव काकुळतं आला... जीव काकुळतं आला...!  :'(

तिला सारले मी दूरी... लेत विरहाच्या सरी...
वहात पाट आसवांचे... डोळा भळाळत गेला...!
आता राहिले न काही... तिच्या माझ्या ओंजळीत...
तिला झ-याशी सोडून हा व्याकुळता झाला...!
जीव काकुळतं आला... जीव काकुळतं आला...! :'(

भूतकाळाचे ते पान आज गहाळसे झाले...
तरी निरखून वर्तमान.. मला न्याहाळत गेला...!
शोधू गेलो नव्या वाटा... चारी दिशांच्या ओघाने...
रणरण वाळवंटी वेडा भटकत गेला...!
जीव काकुळतं आला... जीव काकुळतं आला...! :'(

पाजळून संथ ज्योती... दिवा प्रकाशित झाला...
पतंगाच्या वाटेवर पुन्हा काजळत गेला...!
करी सांगावे, कांगावे मनी ईमले बांधले...
ईमल्यांच्या मागंपुढं पुरा रेंगाळता झाला...
जीव काकुळतं आला... जीव काकुळतं आला...! :'(

अशी जीवनवाकळ... ठायी ठायी ओवू केली...
सवे वाकळाच्या जीव पार ठिगाळत गेला...!
कुणी रोकायाला नाही... कुणी टोकायाला नाही...
डागाळलेला चांदवा आप झाकाळत गेला...!
जीव काकुळतं आला... जीव काकुळतं आला...! :'(
                                                         महेंद्र....!  :'(







केदार मेहेंदळे

जीव काकुळतं आला... जीव काकुळतं आला...!


mast....



santa143

खूपच ह्रुदयस्पर्शि छान............