“तू प्रेम गं काय समजणार....!”© चारुदत्त अघोर

Started by charudutta_090, October 18, 2011, 03:41:43 PM

Previous topic - Next topic

charudutta_090

ॐ साईं
"तू प्रेम गं काय समजणार....!"© चारुदत्त अघोर (१९/९/११)
तू विचारच समजू नाही शकत,
तर भावना काय समजणार;
तू दुरावाच समजू नाही शकत,
तर विरह गं काय समजणार;
गाणंच कधी ऐकत नाही,
तू गझल काय गं समजणार;
तूला प्रणयच माहित नाही,
तू प्रेम गं काय समजणार....!

पीडाच अंगी झेलत नाही,
तर बोच काय समजणार;
अश्रूच जर माहित नाही,
तर दव थेंब काय समजणार;
तूला उमलणच माहित नाही,
तर यौवन बहर काय समजणार;
तूला प्रणयच माहित नाही,
तू प्रेम गं काय समजणार....!

तूला प्रतीक्षाच माहित नाही,
उशीर गं तू काय समजणार,
हरवलच नाही कधी काही,
तर गवसणं काय समजणार;
कधी रागवतच नाहीस,
तू रुसणं काय समजणार;
तूला प्रणयच माहित नाही,
तू प्रेम गं काय समजणार...!

हर क्षण सारखा वाटणारी तू,
कातर सांज काय समजणार;
कधी काटेच बघितले नाहीस,
तू प्रेम टोच कशी समजणार;
कधी उसवता श्वासच घेतला नाहीस,
पडल्या हृदयी,खोच काय समजणार;
तूला प्रणयच माहित नाही,
तू प्रेम गं काय समजणार...!

उमलणच तूला माहित नाही,
तू पालवी गं काय समजणार;
अंगी शहारते काटेच नाही समजत,
तू मखमली शेवाळ काय समजणार;
तूला दुरावाच माहित नाही,
तर तू जवळीक काय समजणार;
तूला प्रणयच माहित नाही,
तू प्रेम गं काय समजणार...!

कोरड्या आयुष्यी रमणारी तू,
तूला मदनी ओलावा काय समजणार,
स्वतःचीच असलेली स्तीतप्रज्ञ तू,
प्रेमात वेडावणं तू काय समजणार; 
प्रणयी पातळीस अजाण तू,
शृंगारी उच्चांक काय समजणार;
तूला प्रणयच माहित नाही,
तू प्रेम गं काय समजणार...!
चारुदत्त अघोर(१९/९/११)

mkhangan07


केदार मेहेंदळे