आपल वय होत आलय

Started by केदार मेहेंदळे, October 24, 2011, 11:30:18 AM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

श्री अनिल अवचट यांच्या "मस्त मस्त उतार" ह्या कविता संग्रहातल्या "आपल कुठे वय झालाय" ह्या कविते वरून सुचलेली कविता.

रस्त्यावर   चालणारी
प्रत्येक गाडी
आपल्याच अंगावर येतेय
असं वाटायला लागत
तेंव्हा समजाव......
आपल वय होत आलय.

फंक्शन मधली
गर्दी बघून
आपण लौकर जन्म्लोय
म्हणून वाटायला लागत
तेंव्हा समजाव......
आपलं वय होत आलय.

स्कूटर वरून
मुसळधार पावसात
बायको बरोबर फिरण्या पेक्षा
घरातच भजी खावीशी वाटतात
तेंव्हा समजाव......
आपलं वय होत आलय.

ऑफीस सुटल्यावर
मित्रांच्या पार्टीतून
बायको एकटी असेल
म्हणून कल्टी माराल
तेंव्हा समजाव......
आपलं वय होत आलय.

ऑफीस मध्ये
जॉइन झालेल्या
नवीन मुलींना बघून
आपली मुलगी आठवेल
तेंव्हा समजाव......
आपलं वय होत आलय.


केदार....
::) :P :D

soumya


rudra


फंक्शन मधली
गर्दी बघून
आपण लौकर जन्म्लोय
म्हणून वाटायला लागत
तेंव्हा समजाव......
आपलं वय होत आलय.


v.nice kedar....... :)

काव्यमन

ऑफीस मध्ये
जॉइन झालेल्या
नवीन मुलींना बघून
आपली मुलगी आठवेल
तेंव्हा समजाव......
आपलं वय होत आलय......हीच खरी वस्तुस्थिती असते नाही का?

sudhakargajre

chhaan.....way zalelyanchya manatala......sangitala.....faaar...chhaann...

Pravin5000


Ravi Padekar