देवा अजब तुझा कारभार ||

Started by किरण गोकुळ कुंजीर, October 24, 2011, 08:25:11 PM

Previous topic - Next topic
देवा अजब तुझा कारभार ||

ज्याला सुख दिलंस त्याला समाधान माहित नाही,
नि समाधानी असलेल्याकडे सुखाची साधनं नाही,
कोणालाच तुझा नियम कसा कळत नाही ?
यालाच का म्हणतात संसार !
देवा अजब तुझा कारभार ||

सहज सगळं मिळालं तर किंमत नसते लोकांना,
म्हणून अडथळे आणतोस हे का कळत नाही त्यांना,
तुझ्यावर विश्वास नसतो त्यांचा
म्हणून लावतोस ना विलंब फार.
देवा अजब तुझा कारभार ||

आनंदी वातावरणात गर्व चढतो माणसाला,
नि फक्त दुःखातच तो हाक मारतो ना तुला,
त्यांनी तुला लक्ष्यात ठेवावं
यासाठीच असतो ना हा चढ-उतार.
देवा अजब तुझा कारभार ||

तूच सृष्टीचा निर्माता नि तूच पालनकर्ता,
कोणी तुज म्हणती निसर्ग तर कोणी विधाता,
आस्तिक असो व नास्तिक, कोणच करू शकत नाही
तुझ्या अस्तित्वाला इन्कार.
देवा अजब तुझा कारभार ||

                   किरण गोकुळ कुंजीर