भास गोजिरा

Started by शिवाजी सांगळे, September 14, 2025, 08:21:00 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

भास गोजिरा

सखये भास तुझे भोवती का सारखे फिरावे
सावलीत न् कधी जळी प्रतिबिंबात दिसावे

बावरते वेळोवेळी, जसे वाऱ्यावरी फुल वेडे 
बैचेन मन माझे का म्हणे भ्रमरा सम वागावे

छाया, पडछाया, अचानक कवडसे बिलोरी
धरु पाहता हाती सारेच का नजरेतून सुटावे

ओढ वेड्या मनाची, माझ्या आगळी वेगळी
जाणून सत्य ते, तुला सहज का न उमजावे

ठेवावी कुठवर मी आशा, भेट होण्या तुझी
विचार करता हसू, न् प्रत्यक्षात मी फसावे?

किती काळ जोपासू,भास हा मनी गोजिरा
भेट नसता समक्ष,जगण्या त्राण कसे उरावे

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९