दूर

Started by rutwik, April 05, 2009, 10:56:38 AM

Previous topic - Next topic

rutwik

गेलात दूर तुम्ही आकाश शोधण्याला
आणीक दूर झाली भूमी अता तुम्हाला!

झालां गरूड तुम्ही घेऊन पंख त्याचे
घरट्यास आसर्याला जागा नसे तुम्हाला!

हनुमंत होउनीही रवि आणण्यास गेला
परतून ना कधीही प्रभु भेटला तुम्हाला!

विझलात आसमंती जळुनी उगा फुकाचे
ज्योतीसवे न केव्हा गणले कुणी तुम्हाला!

गेलात दूर तुम्ही अमुच्या मनातुनीही
इथल्या जगात आता थारा नसे तुम्हाला!

                                              -ऋत्विक फाटक

madhura

हनुमंत होउनीही रवि आणण्यास गेला
परतून ना कधीही प्रभु भेटला तुम्हाला!


mast ch


GauravModak

good one !

जग जवळ आले मात्र माणसे दूर गेली
अशी कशी पृथ्वीला अवकळा आली !!!