तुझ्या विचारांत

Started by Rupesh Naik, November 06, 2011, 11:59:10 AM

Previous topic - Next topic

Rupesh Naik

...........तुझ्या विचारांत
            ...रुपेश नाईक

पाऊल वाट जागीच असते
पावलेच उगाचच चालतात
दृष्टीच जरा मंदावली असेल
दोष मात्र धुक्यांना लावतात

नाजूक हळुवार पाऊल जरी
ठसे ओल्यामातीवरच उमटतात
हळव्या मनावरच म्हणून
ओरखडे जरा खोल दिसतात

मेघ घनदाट बरसतात जरी
अश्रूही आपला वसा उचलतात
पावसाच्या थेंब आड ते
आपले अस्तित्व लपवतात

त्याच विचारांचा मग
पुन्हा पुन्हा विचार होतो
अन त्याच थेंबांना घेऊन
पुन्हा तो पाऊस बरसतो

                 --- रुपेश नाईक

केदार मेहेंदळे