प्रेमाचे श्लोक..

Started by shindemithil, November 17, 2011, 09:35:39 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मिथिल शिंदे, सर

     शुभ दुपार ( रविवार )
     आपणांस श्री अतुल परब ( कविराजे ), यांचा नमस्कार आणि अनेक शुभेच्छा. प्रेमावरली प्रस्तुत कविता आवडली. ही प्रेम-रुपी, प्रेम-श्लोक कविता आपण पुन्हा पोस्ट केलीत, याबद्दल आपले कौतुक. यापूर्वी ही पोस्ट आपण दिनांक-१७.११.२०११, रोजी पोस्ट केली होती. थोडक्यात काय प्रेम कविता केव्हाही वाचा, त्या कधीही नवीनच भासतात. त्या कधीच जुन्या वाटत नाहीत. आपल्या या कवितेतून काही वेगळे आणि काही नवीन वाचIवयास मिळाले. येत्या, १४.०२.२०२३, या प्रेम-दिवसाच्या पार्श्ववभूमीवर ही कविता करण्याचे औचीत्त्यही आपण साधले आहे.

     यापूर्वीही एका ब्लॉग-मध्ये कुणा एका कवीने मनाच्या श्लोकांवर सद्य-परिस्थितीवर आधारित एक विडंबन काव्य-श्लोक, रचल्याचे मला आठवलं. तेही मनाला भावल होत. असे अनेक नवे प्रयोग करून पाहण्यास काहीच हरकत नाही.

     पुन्हा एकदा आपणास यापुढील यशस्वी वाटचालीस माझ्या अनेक शुभेच्छा देतो.

--या मनावर एक छोटीशी कविता--

मना कधी का ओळखले कुणी ?
मना कधी का जाणिले कुणी ?
मना कधी का चाचपले कुणी ?
मना कधी का पाहीले कुणी ?

ठाव मनाचा न शोधूनी सापडे
अंतरंगात काय आपुल्या दडे
डोहापरी गहिरे हे गूढ मन,
गुज लपवितो, काय करील बापुडे.

मन दिसले का कधी कुणा ?
फक्त एक जाणीव आहे हेच जाणा
कधी व्यक्त होतं, प्रकट होतं,
खूप काही मनातच राहून जातं .

मनावर रचल्या गेल्या खूप कविता
पण नाही कधी जाणवली पूर्णता-पूर्तता
कितीही केले उघड, तरी राहते बाकी,
अथांग, तळ नसलेल्या सागरासारखी.

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-12.02.2023-रविवार.
=========================================