आज पुन्हा त्या रामाची गरज आहे...

Started by avinash mohan, November 25, 2011, 01:31:48 AM

Previous topic - Next topic

avinash mohan

"तो एक काळ होता,
राम आई साठी वनवासात गेला होता,
... आज पुन्हा त्या रामाची गरज आहे.....
फेसबुक वर मित्रांच्या स्टेटस वर १०० कमेंट्स देणाऱ्या आम्हाला
... ... घरातल्या आईला "कशी आहेस गं?"
हे विचारायला वेळ नाही.
आज पुन्हा त्या रामाची गरजआहे.
मित्र मैत्रिणीचा वाढदिवसएक एक
महिना आधी लक्षात ठेवणाऱ्या आम्हाला
आई वडिलांच्या साध्या जन्तारखा माहित नाहीत
आज पुन्हा त्या रामाची गरजआहे.
गर्लफ्रेंड बरोबर एक तास एक मैल फिरणाऱ्या
आम्हाला आईने सांगितल्या वर
हाकेच्या अंतरावरून दळण आणायला वेळ नाही
आज पुन्हा त्या रामाची गरजआहे.
ऑफिसमध्ये मित्रांच्या डब्यातले
खाऊन "आईला सांग मस्त झालीय भाजी"
अशी स्तुती करणाऱ्या आम्हाला
घरातल्या आईने केलेल्या पिठल्याची
स्तुती करायला आमच्याकडे वेळ नाही.
आज पुन्हा त्या रामाची गरजआहे........
आजारी मैत्रिणीला हजारवेळा
हॉस्पिटल मध्ये भेटायला जाणाऱ्या
आम्हाला घरातल्या
बाबांना "आता कसे आहेत पायतुमचे?"
ह्या पाच शब्दांसाठी वेळ नाही,
आज पुन्हा त्या रामाची गरजआहे......"
"कोणती नाती कशी सम्भाळायची हे तुमच्याच हातात आहे"
जरा विचार करा .........