"अनोळखी वाट."© चारुदत्त अघोर.(२५/११/११)

Started by charudutta_090, November 26, 2011, 09:09:46 AM

Previous topic - Next topic

charudutta_090

ॐ साईं
"अनोळखी वाट."© चारुदत्त अघोर.(२५/११/११)
कधी या मार्गी पाउललो नाही..
न कधी इकडे वळलो नाही..
का तरी याला बघून नयन ओलवतात,
कुठे तरी मन-झोकी भावना झुलवतात..
नुसतीच भावना हि, कि काही मागचे गोते..
पण मी तर एकलाच....न मला काही नाते..
का या रस्त्यास बघून, माझे हृदय दाटते...
का हि अनोळखी वाट... मला परिचित वाटते...?

किती सुना असला जरी, तो वृक्ष छायी बाक..
तरी कुठे तरी वाटतं,कि कोणी देतंय हाक..
वाटतं कि माझ्याच हृदयातून हि निघाली...
माझ्याच कविता रूप नमित पावली..
सरसरत्या पानगळी..जणू हि करतेय वार्ता..
सांगतेय मला तूच..शाब्दिक पालविंचा करता..
का या रस्त्यास बघून, माझे हृदय दाटते...
का हि अनोळखी वाट... मला परिचित वाटते...?

त्या जखमी मनास,पांघर्तेय जाळी शाल..
हर श्वासी माझ्या देतेय, लयबद्ध ताल..
नाही माहित कुठे आहे हिचा अंत..
का तरी वाटते हिच्या नाती खंत...
न जाणे हि वाट कुठे लांब धावते..
विचारांचा एक श्वास अटकून लावते..
का या रस्त्यास बघून, माझे हृदय दाटते...
का हि अनोळखी वाट... मला परिचित वाटते...?

हि वाट अनोळखी जरी ,तरी आहे ऋणानु बंधित..
नवी हवा वाहती,तरी दरवळ परिचित गंधित..
जिने अटकवला माझा उसवून श्वास..
एकंच धागा ओढला,तरी गळावला फास..
न माहित कुठे हिचा उगम कि बेलगाम सुटते...
किती मनास आवरलं तरी ते तीळतीळ तुटते..
का या रस्त्यास बघून, माझे हृदय दाटते...
का हि अनोळखी वाट... मला परिचित वाटते...?
चारुदत्त अघोर.(२५/११/११)