पहिल्या सारखं आता लिहायला सुचत नाही...

Started by Rushi.VilasRao, October 18, 2025, 12:25:30 AM

Previous topic - Next topic

Rushi.VilasRao

मी काही तरी लिहायचो...
ती मी लिहिलेलं वाचायची...
मी काही तरी मांडायचो...
मला काही तरी सुचायच....
मी ऑनलाईन पोस्ट करायचो...
ती हळूहळू प्रतिक्रिया देऊ लागली...
प्रतिक्रिया येतात म्हणाल्यावर आता
चर्चा हळूहळू होऊ लागली....
गप्पा हळूहळू रंगू लागल्या, देवाण घेवाण विचारांची होऊ लागली...
हळूहळू आमची ओळख वाढली...
लिखाण अजून रंगू लागलं...
कधी एका मेकांच वर्णन...
तर कधी स्तुती होऊ लागली...
स्तुती ला नजर लागू नये म्हणून टीका सुद्धा होऊ लागली...
लिहिलेलं पोस्ट होऊ लागलं...
सातत्य या क्रियेत नियमित होत...
पण बदल होण निसर्गाच्या कायद्यात नमूद होत...
नोकरदारी आमच्या नशिबी आली...
लिखाणही आता मंदावत गेल...
रोजच्या धडपडीच्या जीवनात थोड मागे मागे पडत गेल...
प्रतिक्रिया हळूहळू कमी झाली...
प्रतिक्रिया देणारी सुद्धा आता कुठल्या कुठे मागे सुटून गेली...
नोकरी धंद्याच्या नादात आता पहिल्या सारखं लिहायला सुचत नाही...
विचार मनातच खुंटून गेले...
छंद जोपासायच राहील बाजूला...
छंदा समोर मिळवायचे प्रश्न मोठे झाले...
@Rushi.VilasRao ✍️