अतिरेकी ...मुंबई पोलीस...सरकार...आणि आपण.....

Started by amitunde, December 25, 2011, 06:15:30 PM

Previous topic - Next topic

amitunde

व्यर्थ न हो बलिदान.............

मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी काळजाचा थरकाप उडविणाऱ्या व अत्यंत भीषण अशा हल्ल्यात अनेक पोलीस अधिकारी धारातीर्थी पडले होते ...त्यानंतर सरकारने तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते व अक्कल गहाण ठेवलेल्या जनतेने पण त्यांच्यावर लगेच विश्वास ठेवले होता ....पण आज ३ वर्षानंतरही यात काहीही बदल झालेला नाही ...

अत्यंत तुटपुंजे वेतन, राहण्......यासाठी असलेली १० बाय १०ची घरे, कामाचे रोजचे २० तास, प्रचंड मानसिक तणाव व राजकीय दवाब या सर्वांमध्ये मुंबई पोलीस भरडला जातोय...पण त्याची कुणालाच पर्वा नाही...भ्रष्टाचारात बाटलेली बुलेट प्रुफ ज्याकेट, गंजलेल्या बंदुका आणि काठ्या घेऊन अजून किती दिवस त्यांच्या कडून संरक्षणाची अपेक्षा करायची ...??

निष्क्रिय व अतिशय शांतता प्रिय असलेले सरकार, सुस्त झोपलेले विरोधी पक्ष, बेधुंद झालेली तरुणाई, वाढत्या महागाईमुळे त्रस्त झालेले नागरिक, बोकांडीवर बसलेला भ्रष्टाचार, अवाढव्य अशी लोकसंख्या व नजर लागतील असे शेजारी...नक्की कोण जबाबदार आहे या सगळ्याला....???

मी तर म्हणेन आपणच जबाबदार आहोत या सगळ्याला...स्वताला सुशिक्षित समजणारा मध्यमवर्गीय भारतीय समाज व आधुनिक म्हणवणारी तरुण पिढी या सगळ्यापासून अलिप्त आहे...येमेन,लिबिया यासारख्या अविकसित अरब जगतातील तरुण पिढी तेथील हुकुमशाही उलथवून टाकत असेल तर मग आपण का नाही ....?

आज अरुणाचल प्रदेशच्या ७०% भागावर चीन दावा सांगत असताना आपण किती दिवस गप्प बसायचे..आसाम,छत्तीसगडमधील नक्षलवाद्यांवर कारवाई करायला आपण सरकारला भाग का पाडत नाही...मेघालय, नागलंड सारख्या ईशान्येकडील राज्यांना सापत्वपानाची वागणूक का दिली जातेय ...हॉकीच्या दुराव्यवस्थेवर कोणतीच कारवाई का नाही....???

आज पाकिस्तानचे पंतप्रधान पण कसाबला फाशी द्या म्हणून सांगतात पण सर्वोच न्यायालय फाशीच काय साधी कोणतीही शिक्षा देवू शकले नाही...अफजल गुरूच्या फाशीची अंमलबजावणी पण आपण करू शकलो नाही...

आण्णा हजारेंचे आंदोलन फक्त तरुणांच्या पाठिंब्यामुळे यशस्वी झाले आहे...त्यावेळी "हम मे है आण्णा" असे म्हणणारी तरुण पिढी कुठे गेलीय....कुठे गेलंय ते सळसळनारे रक्त ....का ते स्वताहून एका नव्या क्रांतीची सुरुवात करू शकत नाहीत....????

मित्रानो विचार करा...फक्त सरकारला दुषणे देऊन काहीही होणार नाही....नाहीतर काही दिवसांनी पाकिस्तानने तामिळनाडू मागितल्यावर सरकार म्हणेल शांततेने मार्ग काढू आणि आपणही फक्त फेसबुकवर चर्चा करण्यात धन्यता मानू...

वेळीच विचार आणि उपचार करा ........नाहीतर म्हणत बसा...

पळसाच्या पानाला ढाल केल असत आणि
बाभळीच्या काट्याला तलवार केल असत...
पण आमच्यातच एकी नाही....
नाहीतर महाराष्ट्राचच काय दिल्लीच पण तख्त उध्वस्त केल असत...

जय हिंद....
जय महाराष्ट्र...

अमित सतीश उंडे........ 

santoshi.world

very well said...
पळसाच्या पानाला ढाल केल असत आणि
बाभळीच्या काट्याला तलवार केल असत...
पण आमच्यातच एकी नाही....
नाहीतर महाराष्ट्राचच काय दिल्लीच पण तख्त उध्वस्त केल असत...

rudra