आता तरी भाव द्या

Started by gurjar.makarand, December 26, 2011, 05:44:25 PM

Previous topic - Next topic

gurjar.makarand

भेगाळलेल्या जिमिनीला, भिगायाला वाव द्या,
हिरवं शेती सपनाला, आमच्या मनी ठाव द्या.

पेटलंय ते रान कापसाच, पाण्याइना जळतंया ते बीज,
हिरीत पानी आसल तवा, थांबत नाही इज.
मोप पैकं ओतलं तरी, पिक फुलोरा धरंना,
लाकडं वाळून गेली तरी, चूल काय पेटना.
भिकाऱ्यापरी सवता घरी, तरी मला राव्ह द्या,
पार पिचून गेलोय सरकार, आता तरी भाव द्या.

कधीतरी सोडलं व्हतं तुम्ही, आम्हासाठी पानी,
नद्या, ओढं वाहून गेलं, आलं नाही रानी.
वाट बघत सरत चालला, दिसं आयुष्याचा,
कधीतरी आस दावत येतो, सडा पावसाचा.
कष्टामध्ये न्हाऊन झालायं, पावसात आनंदाच्या न्हाव द्या,
पार पिचून गेलोय सरकार, आता तरी भाव द्या.

शिकशान भीडलयं आकाशाला, शिकत न्हायत पोरं,
चाऱ्याइना वाळत चालली, दारा म्होराची ढोरं.
शहरांनबी धाव घेतली, ऱ्हायली नायी गावं,
जो तो पैक्यासाठी जगतोय, घेतोय शहरी धाव.
आसवं आमची सुकत चालली , आता ऊर फुटून रडू द्या,
पार पिचून गेलोय सरकार, आता तरी भाव द्या.

कापडं फाटली सारी जरी, फाटलं नाय काळीज,
रात उलटून गेली तरी, झोप येईना डोळीच,
धगधगतय ऊर मनाचं, इचारानं पोराच्या,
कधी उडणं छत घराचं, हेलकाव्यानं वाऱ्याच्या,
भूतकाळ झालो मी जरी, भविष्य त्याचं घडू द्या,
पार पिचून गेलोय सरकार, आता तरी भाव द्या.
                         
                                                                        कवी: मकरंद गुर्जर
                                                                     19-12-2011



santoshi.world


केदार मेहेंदळे

khup chan mandaly ......... paristhiti kharach kathin aahe

Amol Ashok Devkar

मराठा हि जात माझी,
महाराष्ट्रात लागते वाट माझी,
मराठा हि माझी जात आहे
याच्यात चूक तरी काय माझी????
इत्तर जातींची चांदीचचांदी,
...कॉलेजमध्ये अडमिशन मिळते कुठेही,
मार्क असतील कमी तरीही???
अन्याय होत असतील कितीही,
मोडेन पण वाकणार नाही.......
जय हिंद, जय महाराष्ट्र!!!!!!!
        अमोल देवकर.....