तू

Started by Marathi Kavi, December 28, 2011, 11:50:14 AM

Previous topic - Next topic

Marathi Kavi

तू

तुझ असे सजणे..

जणू जीवाला ह्या वेड लावणे..

काबूत रहाव तुझ्या नेहमी..

असे सौंदर्य तुझ डोळ्यात भरणे..

का नाही मोह करावा तुझ्या एक कटाक्षाचा मी..

तुझ्या वाटेवरती कमी वाटते हृदय हे अंथरणे...

दंग होई कुणी असा तुझा साज..

मखमली गालाला नथनीचा बाज..

किती नाजूक आहेस तू तेव्हा देव हि हळवा झाला असेल..

पाठवले तुला धरतीवर तेव्हा एक तारका कमी झाली असेल..

भाळणे सौंदर्याला हि साहजिक गोष्ट खरी..

पण तुझ्या सौंदर्यात साधेपणाची मूर्ती दिसते बरी..

ह्या लक्ष दिव्यांचा उजेड कमी भासतो..

जेव्हा तुझ्या भाळी चंद्रकोर उजळतो..

तुला पाहून का असे वाटते कि तू खूप भावूक असावी..

जशी सारी शालिनता जगातली फक्त या डोळ्यातच उरली असावी..

त्या पापण्यांच्या मेघांनी एक साद दिली असावी..

अन क्षणात सारी धरणी हिरवीगार भिजून होत असावी..



-- Author Unknown


हि कविता तुमची असल्यास आम्हांला कळवा. योग्य ते क्रेडिट्स देण्यासाठी MK बंधन कारक आहे.