गुलाबी कळ्या.....

Started by महेश मनोहर कोरे, December 29, 2011, 10:28:52 PM

Previous topic - Next topic

महेश मनोहर कोरे

नकळत पाहणे तुला
मला स्वर्गसुख वाटते ....

पहिल्यांदा पाहिलं
अन झालो वेडापिसा  :o
मनाने कि तनाने जसा
पाण्यात तडफडतो मासा

प्रेमाची मखमल कळी
सहजच उमलते.....
नकळत पाहणे तुला
मला स्वर्गसुख वाटते   :)

सुंदर अशी दिसतेस
दिपून जाती डोळे   ::)
गजरयातील कळ्यांनाही
मग लागायचे डोहाळे

स्वप्नातील परी मग
सहजच हसते.....
नकळत पाहणे तुला
मला स्वर्गसुख वाटते 

कळायलाच नको तिला
लक्षात ठेवतंय कोणीतरी
अन्यथा अप्रतिम सौंदर्याला
बाधा येईल पैलतीरी

वळवी पाऊस जसा
उष्मधारा सुखविते
नकळत पाहणे तुला
मला स्वर्गसुख वाटते..... 

नकळत पाहणे तुला
मला स्वर्गसुख वाटते..... 

                                     महेश मनोहर कोरे

                             पुणे

महेश मनोहर कोरे

खरच खूप छान वाटत ना......एखाद्या मुलीला अस पाहायला ........