"सखी माझी अशी रे... सांगू तुला कशी रे...?"

Started by msdjan_marathi, January 04, 2012, 12:00:52 PM

Previous topic - Next topic

msdjan_marathi

:-* "सखी माझी अशी रे... सांगू तुला कशी रे...?" :-*
सखी माझी अशी रे... सांगू तुला कशी रे...?
वैशाखाच्या पलंगावरी वसंताची उशी रे...
रणरणत्या उन्हामध्ये झुळूक गार जशी रे...
कुडकुडत्या थंडीत जणू विस्तवाची कुशी रे...
:-* सखी माझी अशी रे... सांगू तुला कशी रे...? :-*

काया तिची सावळ सुंदर... मखमाली मोरपिशी रे...
रूप तीच निहाळताना लाजतो पहा शशी रे...
मन तीच गगनचुंबी... त्यात आभाळाएवढी ख़ुशी रे...
:-* सखी माझी अशी रे... सांगू तुला कशी रे...? :-*

भोवती तिच्या प्रेमाची... तलम,नाजूक कोशी रे...
मन होई सुरुवंट... तिच्या ओढीची मदहोशी रे...
शमवी तहान दृष्टीसवे... ती शीतल सरिता तशी रे...
:-* सखी माझी अशी रे... सांगू तुला कशी रे...? :-*
                                           ...........महेंद्र :-*

Prasad Dhabe

जर आपण मराठी कवी असाल आणि आपल्या कविता आपणास "शेअर" करावयाच्या असतील तर किमायगार वर जरूर रिजिस्टर व्हा आणि आपल्या कविता पोस्ट करा. मराठी कवितांना डेडिकेटेड पहिली वेबसाइट. इथे तुम्हाला नवीन जुन्या दुर्मिळ सर्व प्रकार च्या सर्व कवींच्या कविता वाचायला मिळतील. रसिकांनी किमायगार वर मनसोक्त कवितांचा आनंदा लूटावा.
नोट : ही साइट Beta version आहे. तुमचे अभिप्राय/ suggestions किवा कविता claim kimayagaar2011@gmail.com वर पाठवा.

www.kimayagaar.in