मी हरवून बसलो..

Started by हर्षद कुंभार, January 04, 2012, 08:24:22 PM

Previous topic - Next topic

हर्षद कुंभार

कधी कधी एकटा
बसलेलो असतो मी...
सर्व नाती ,गोती, मैत्री
विसरत चाललो आहे मी,


रस्त्याला चालत असताना...
आजूबाजूचे भान राहत नाही,
लांब जाणाऱ्या रस्त्याची...
अजून कुणाची साथ नाही. 


ह्या माणसांच्या गर्दीत... 
धुरकट होत चालले आहे मी,
माझा मीपणा हरवून बसलो...
असे कसे घडले हेच विसरलो आहे मी 


मुळ संकल्पना : शैलेश कुंभार
सुधारणा : हर्षद कुंभार