पापण्या .......

Started by महेश मनोहर कोरे, January 04, 2012, 11:59:22 PM

Previous topic - Next topic

महेश मनोहर कोरे


तुझ्या माझ्या प्रीतीचा
गंध पसरला सगळीकडे
डोळ्यांदेखत हरवला
एकांत जरा कोणीकडे

ठरवलं होत ....
सांगायचं नाही कोणाला
पण हळूच कळाल.....
त्या पहाटेच्या रातकळीला

हळू हळू सर्वाना
लागली त्याची खबर
बाकी कोणी नाही
पण घरच्यांनी खोदली कबर

आता कळलच आहे
तर नको लपवायला
मित्र होतील बेजार तर
घरचे येतील संपवायला

यावर एकच उपाय 
बदलावा प्रेमाचा पाढा
उगाच नको त्रास
घ्यावा आपण विषकाढा

शेवटी
      एकच विचार येतो
      नेमकं हरलं तरी कोण
      प्रेम की माया..
      का नशिबानेच करावा पण..?....

      का नशिबानेच करावा पण.


                                          महेश मनोहर कोरे
                                                   पुणे

Prasad Dhabe

जर आपण मराठी कवी असाल आणि आपल्या कविता आपणास "शेअर" करावयाच्या असतील तर किमायगार वर जरूर रिजिस्टर व्हा आणि आपल्या कविता पोस्ट करा. मराठी कवितांना डेडिकेटेड पहिली वेबसाइट. इथे तुम्हाला नवीन जुन्या दुर्मिळ सर्व प्रकार च्या सर्व कवींच्या कविता वाचायला मिळतील. रसिकांनी किमायगार वर मनसोक्त कवितांचा आनंदा लूटावा.
नोट : ही साइट Beta version आहे. तुमचे अभिप्राय/ suggestions किवा कविता claim kimayagaar2011@gmail.com वर पाठवा.

www.kimayagaar.in

RAGHAV LOHAR

#2
uttaam !!

sindu.sonwane


केदार मेहेंदळे


महेश मनोहर कोरे


bomble prashant