ती सांज रंगलेली

Started by dhanaji, January 06, 2012, 02:59:54 PM

Previous topic - Next topic

dhanaji

अशोक गोडबोले  यांची मला आवडलेली एक कविता पोस्ट करत आहे


ती सांज रंगलेली धुंदीतल्या क्षणाने
चोरून प्रीत नेली ओठातल्या स्मिताने

वारा उनाड वाहे उडवीत कुंतलाना
नजरेस रोखलेल्या स्वप्नास झाकताना

काठावरी झर्‍याच्या एकांत स्वर भुकेला
तरुसावल्या सलीली निशःब्द सोबतीला

हातात हात दोन्ही गुंफून बोलण्यास
ते ओठ विलग होती शब्दास शोधण्यास

परिते मुकेच राहे पहिलेच प्रेमगान
डोळ्यात धृवपदाच्या ओळी निळ्या लिहून

सोडून कर कधी ती गेली मला कळेना
तो स्पर्श अमृताचा दिक्कालही पुसेना

ती सांज गाजलेली आषाढ घनरवाने
मेघास गुपीत माझे कथिले महाकवीने

काठावरी झर्‍याच्या वाहे अजून वारा
उडवीत आठवांचा वेडा खुळा पसारा

--अशोक गोडबोले