वंशाचा दिवा की ज्योती .......

Started by salunke.monika, January 08, 2012, 04:43:36 PM

Previous topic - Next topic

salunke.monika

 वंशाचा दिवा की ज्योती .......

पहिली बेटी धनाची पेटी, पण तरीही एक मुलगा हवा त्या मायेच्या पोटी,
मुलीसाठी केलेलं सर्व जाट फुकट , मुलगा करी असलेल दाम दुप्पट....

जन्म घेतला जिच्या उदरी , ती एक मुलगीच होती हे तो विसरी
केले ते सर्व वंशासाठीच, वंशाचा दिवा असतो घरासाठी......

क्षण एक एक जगता जगता , मान तिचे मारतात सर्वथा
वृद्ध होतं सांभाळ करणार तो, सरतेशेवटी आधार बनणार तो .....

कमी जास्त वाटणी पाहून, बसे दुखं : उरी मनी कवटाळून
घरचा तो असे राजकुमार, पाहिजे ते मिळता होई गर्व फार ....

कितीही असले भेदभाव जरी, प्रेम असे तिचे आई वडिलांवरी
नसे काळजी त्या दिव्याला , सुख मिळूदे फक्त माझिया जीवाला ....

अंथरुण धरिती हात पाय न हलता , जीव न लागे मुलीचा सासरी असता
करुनी काम सारे दमछाक होते बायकोची , जन्म दात्याचे नाही पण दुख: भारी त्या बायकोचे...

मुलगी होणे हा गुन्हा नसे तिचा, करावा विचार थोडा तिच्याही मनाचा
मुलगा -मुलगी होणे नसते आपल्या हाती, ती तर असते उद्याची प्रकाश देणारी ज्योती....

हेमा सावंत

केदार मेहेंदळे