एक मुलीच्या भावना ..........

Started by महेश मनोहर कोरे, January 09, 2012, 11:20:06 AM

Previous topic - Next topic

महेश मनोहर कोरे

अचानक पाने समोर येऊन
शेवटी आज तो बोलला होता
कोंदटलेल मन मोकळ करताना
किती घामाघूम झाला होता.... :o

थोड्या वेळा पूर्वीच्या प्रसंगाने
अंगावर येतो काटा
काही क्षणातच त्यान माझ्या
मनाला शोधल्या नवीन वाटा

" अहो १ min . थांबाल का "
आर्त आवाज कानी पडला
कळलेच नाही माझे मला
पावलांचा घोडा का जागच्या जागीच थबकला ?

आता मी हि घाबरले
जणू कावळ्याने मारली चोच
गर्कन मागे वळून पाहिलं
तर जवळ येत होता तोच

पाहून त्याला मी
घट्ट पकडले मैत्रिणीचे बोट
शोधक नजर खाली गेली
तर किंचित पकडले दातात ओठ

" नाझ्याशी मैत्री कराल का "?
तो बोलला अडखळत
" मला थोडा वेळ द्या "
माझे शब्द बाहेर पडले नकळत.... :-\

तो अजून बराच काही बोलला
त्यान जुळविल्या शब्दांच्या माळा
मात्र माझा उगाचच चालला होता
रेशमी ओढणीशी चाळा

" तू तर काहीच बोलत नाहीस "
पार केला त्यान मनाचा घाट
" मला उशीर होतोय "
मी लगेचच शोधली पळवाट

निश्चल मानाने मी सोडली
त्या जागेवर एक आठवण
तो मात्र तिथेच होता
जणू करत होता त्याची साठवण.... :)

त्या प्रसंगाच्या आठवणीने
डोळ्यात आनंदाचे अश्रू तरळले
आपण त्याला हो म्हणायला हव होत
मन उगाचच ओशाळले

आता सहन होत नव्हता
या मनाचा एकटेपणा....

आता
सहन होत नव्हता
या मनाचा एकटेपणा
चालून आलीच आहे संधी
तर पाहू त्याचा एकनिष्ठपणा ......

                                         महेश मनोहर कोरे
                                                  पुणे

केदार मेहेंदळे



महेश मनोहर कोरे



महेश मनोहर कोरे


महेश मनोहर कोरे

एका मुलीचं मन ओळखन ही एक खूप अवघड गोष्ट असते .....!

Ganesh sutar

केदार मेहेंदळे ji mast aahe kavita

gani

hero

kedar bolala manje sahi kavita asanar tyalach kalate kavite madhale bakichyana kahi kalalat nahi

महेश मनोहर कोरे

ganesh & hero.....

thanks 4 ur reply....... :)

keep reading poems.................................