***

Started by salunke.monika, January 09, 2012, 12:46:36 PM

Previous topic - Next topic

salunke.monika

स्वर्ग ,नर्क अन पृथ्वी काय
सगळच आगदी सेंम आहे
देव दानवान प्रमाणेच
आपलेही आगदी तेच आहे

हिरवळीने नटलेली पृथ्वी
स्वर्गालाही भुरळ पडत होती
पृथ्वीवरील माणसेही
स्वर्गात जाण्यास धडपडत होती

देवच अवतार घेऊन
बालरूपात येतात या भूतलावर
पण दानवांच्या कचाट्यात सापडून
दानव होऊन मग फिरतात त्या यमलोकावर

म्हणे स्वर्गातील कारभार देवराज पाहतात
पृथ्वीवर हि ते त्याची प्रचीती देतात
एवढेच हुशार आहेत तर .....
का मग पृथ्वीवरून चांगल्या लोकांना ते घेऊन जातात

राजकारणाचा विळखा तर सगळीकडेच आहे
स्वर्ग नर्क आणि पृथ्वी काय त्याहून वेगळे आहे
देव आहे म्हणूनच तर दानवही आहेत
त्यांच्यामुळेच तर जीवनाचे चक्र हे सुरळीत चालू आहे       (MONIKA)

केदार मेहेंदळे

sundar vichar..... ani kavita.