लग्न

Started by salunke.monika, January 09, 2012, 12:56:18 PM

Previous topic - Next topic

salunke.monika

लग्न हा जीवनातील महत्वाचा क्षण असतो .
मुलीसाठी मात्र तो दुःखाचा डोंगर आसतो
कारण तोच एक क्षण पक्ष्याच्या थव्यातून एका पक्ष्याला उडून देत आसतो .
लग्न जवळ आल्यावर तयारीला लागतात...
मनात नसून सुधा नातेवाईक कर्तव्य पार पडतात .
आक्षदा टाकून जीवनगाठ बांधून टाकतात .
सात फेऱ्यात अडकवून जणू काही शपथ देतात
त्यात तिला सभाळंण्यासाठी बंधने आसतात ,
आई बहिणींची माने मात्र रडतच आसतात तोंडावर हसू ठेवून दुःख लपवत आसतात
लग्नात आई वडील कन्यादान करतात , त्यांच्यानुसार परक्याचे धन परक्याला देतात
पण त्याच क्षणी ते त्यांच्या मायेसाठी आसुसलेले पाखरू आकाशात सोडून देतात ..
क्षणभर वडिलांचे नाव सोडून जीवनभरासाठी दुसरे नाव जोडतात .
बघता येईल तेवढ चांगल बघत उरलेलं नशिबावर सोपवत आसतात.
झाल चांगल तर नशीब समजतात .
निरोप घेताना तिला घर सुटत नसते , आई वडिलांचं मन तिच्यासाठी तुटत आसत ..
लाडक्या बहिणीचे मन हुंदके देत रडत आसते... तिचेही मन त्यांचा हात सोडायला तयार नसते ...
बहिणीची माया फार वेडी आसते तेव्हाचा आश्रुंचा सागर अनिर्वार्य असून एकमेकांच्या प्रेमाचा तो पुरावा आसतो ...
एका क्षणात माहेरचा हक्क संपवून सासरचा हक्क सुरु होतो ......
२० वर्ष संभाळण फक्त त्याचं कर्तव्य असत ........

mahesh4812