हताशलेला गोंधळ ......

Started by महेश मनोहर कोरे, January 13, 2012, 12:11:32 PM

Previous topic - Next topic

महेश मनोहर कोरे

तुला प्रेम करणे जमलेच नाही
आणि मला ते व्यक्त करणे

मी वाट पाहिली तुझ्या येण्याची
तुला वाट पाहणे जमलेच नाही
आणि मला तुझ्या वाटेवर चालणे...

मी खूप एकटा होतो तुझ्याविना
तुला साथ देणे जमलेच नाही
आणि मला तुझी साथ मागणे...

मी गुंतत चाललो होतो तुझ्यात
तुला हे गुंतणे समजलेच नाही
आणि मला ते तुला समजावणे...

मी प्रेमात पडलो खरा तुझ्या
तुला या नात्याचा अर्थ कळलाच नाही
आणि मला त्याचा अर्थ सांगणे...
कधी जमलेच नाही .........कधी जमलेच नाही ......


                                                            महेश मनोहर कोरे ...
                                                                    पुणे



महेश मनोहर कोरे