का कळेना?

Started by शिवाजी सांगळे, December 01, 2025, 06:21:07 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

का कळेना?

गुपचूप एकमेकांच्या चुगल्या लावताना
भल्या भल्यांना पाहतो नजरा चोरतांना

कधीकधी मीही एक, आहे बरं त्यातला
घेतो मजा साऱ्याची, गालात हासताना

प्रत्येकात दडलयं, एक खट्याळ लेकरू
लाथाडते, उगाच खडा वाटेत चालताना

माणूस समजदार? आज इतका झाला
मारतो हळूच कल्टी, अन्याय पाहताना

कित्येक जण येथले, चोरांचे साव झाले
झेंडे खास रंगाचे एका हाती उचलताना

का कळेना?मरेल निष्पाप गर्दीत कोणी
निर्जीव दगड एक, भिरकावून मारताना

विसरतोस कसा तू मुळांना त्या माणसा
पोसले पुर्वजांना, त्यांची झाडे तोडताना

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९